मुंबई : आज सर्वोच्य न्यायालयात (Supreme Court) ओबीसी आरक्षण (OBC Reservation) यावर सुनावणी पार पडली, आणि राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळं ओबीसींना आता राजकीय आरक्षण मिळणार असून, आरक्षणासह राजकीय निवडणुका होणर आहेत, असा कोर्टानं निर्णय (Court result) दिला आहे. तसेच ओबीसी राजकीय आरक्षणासह निवडणुका घ्या असे आदेश कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला (State Election commission) दिले आहेत, तसेच लवकरच निवडणुकांच्या तारखा (Election date) सुद्धा जाहीर करा, असे आदेश सुद्धा न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. यानंतर आता राज्यातून नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत, दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) सुद्धा ट्विटच्या (Tweet) माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली दिली आहे.
[read_also content=”शोषित, उपेक्षित समाजाला ताकद देण्यासाठी आरक्षण हे हवेच – जितेंद्र आव्हाड https://www.navarashtra.com/maharashtra/reservation-is-a-must-to-give-strength-to-the-oppressed-marginalized-society-jitendra-awad-306300.html”]
— Raj Thackeray (@RajThackeray) July 20, 2022
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्विट करत या निर्णयाचे स्वागत केले आहे. आपल्या ट्विटमध्य राज ठकारेंनी म्हटलंय की, “स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले, ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे”, असं राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.