Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi:  आशियाई खेळामध्ये १८ वर्षीय अनाहत सिंगने स्क्वॉशमध्ये रौप्य पदक

Maharashtra Breaking News: २८ सप्टेंबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. बँकांचा तीन दिवसीय देशव्यापी संप, आशियाई खेळात भारतीय खेळाडूंची पदकांची घोडदौड, महाड एमआयडीसीतील स्फोट आणि राज्यातील हवामान अंदाज; वाचा सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 28, 2026 | 11:12 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 28. 09.2026

Maharashtra Breaking News Today 28. 09.2026

Follow Us
Follow Us:
  • 28 Sep 2026 11:15 AM (IST)

    28 Sep 2026 11:15 AM (IST)

    पुण्यात बिग बॉस फेम रीलस्टारला अटक; डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, ५ लाखांची मागणी

    सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असलेल्या प्रसिद्ध रीलस्टार दिव्या सुनील शिंदे हिच्यावर निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात घुसून तोडफोड आणि मारहाण केल्याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी कारवाई केली आहे. डॉ. विद्याधर गायकवाड यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने दहा जणांना सोबत घेऊन त्यांच्या घरी जाऊन गोंधळ घातल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात डॉ. गायकवाड जखमी झाले असून, न्यायालयाने दिव्या शिंदे हिला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • 28 Sep 2026 11:12 AM (IST)

    28 Sep 2026 11:12 AM (IST)

    वेतनवाढीसाठी परिवहन कर्मचारी आक्रमक

    Transport Employees Salary Hike: गेल्या ११ वर्षांपासून वेतनवाढ झाली नसल्याचा दावा करत परिवहन कर्मचारी संघटनांनी आज काम बंद आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. प्रशासनाने आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले असले तरी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने परिवहन सेवेवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रवाशांमध्ये चिंता वाढली आहे.

  • 28 Sep 2026 11:10 AM (IST)

    28 Sep 2026 11:10 AM (IST)

    लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून १,५०० रुपये जमा होणार

     राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची  अपडेट  आहे. ऑगस्ट 2026च्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांच्या खात्यात आता १,५०० रुपये जमा होण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे जमा केला जात आहे.

  • 28 Sep 2026 11:05 AM (IST)

    28 Sep 2026 11:05 AM (IST)

    आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

    भारतीय इतिहासातील अत्यंत साहसी, देशभक्त आणि प्रेरणादायी क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी पंजाबमधील बंगा (सध्याच्या पाकिस्तानमध्ये) येथील एका देशभक्त सिख कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबाचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान होते, ज्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या मनात देशप्रेमाचे बाळकडू रुजले होते. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध त्यांनी पुकारलेला लढा आणि समाजवादी विचारांचा प्रसार यामुळे ते तरुणांचे प्रेरणास्थान बनले. सांडर्स वध आणि केंद्रीय विधानसभेत बॉम्बफेक यांसारख्या ऐतिहासिक घटनांनंतर त्यांना २३ मार्च १९३१ रोजी लाहोर येथे फाशी देण्यात आली. हसतहसत फासावर जाणारे भगतसिंग आजही संपूर्ण देशाच्या स्मृतीत ‘अमर शहीद’ म्हणून अजरामर आहेत.

  • 28 Sep 2026 10:55 AM (IST)

    28 Sep 2026 10:55 AM (IST)

    गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार

    सोमवार, २८ सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजार आज लाल रंगात उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीने देखील आज सपाट ते मंद सुरुवातीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आज शेअर बाजारात व्यवहार करताना सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

  • 28 Sep 2026 10:45 AM (IST)

    28 Sep 2026 10:45 AM (IST)

    अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

    राज्यात २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने मदतकार्याला सुरुवात केली आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत प्रत्येकाने संवेदनशीलता दाखवून अनावश्यक खर्च टाळावा, तसेच उपलब्ध पाण्याचे नियोजन करून भविष्यातील पाणीटंचाईला सामोरे जाण्याची तयारी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागरिकांना केले. दरम्यान, मोठ्या धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा जुलै-ऑगस्ट २०२७पर्यंत पुरेल, अशा पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

  • 28 Sep 2026 10:35 AM (IST)

    28 Sep 2026 10:35 AM (IST)

    उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट

    गेल्या काही दिवसांपासून उल्हास नदीच्या पाण्याची गढूळता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पाण्याचा रंग अधिक गडद झाला असून पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ येत असल्याने पाण्याचा उपसा करण्यात व त्याचे शुद्धीकरण प्रक्रियेत अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक भागांतील नागरिकांना नळाद्वारे गढूळ पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

  • 28 Sep 2026 10:25 AM (IST)

    28 Sep 2026 10:25 AM (IST)

    जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी

    शहरातील गजबजलेल्या जुना आग्रा रोडवरील मनोहर चित्रमंदिर परिसरात जुन्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या धुमश्चक्रीदरम्यान संशयितांनी हवेत तब्बल चार राऊंड फायरिंग केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मिळालेल्या माहितीनुसार, जुना आग्रा रोड हा धुळे शहरातील प्रमुख आणि कायम गजबजलेला परिसर आहे. मनोहर चित्रमंदिराजवळ दोन गटांतील तरुण आमनेसामने आले. या दोन्ही गटांमध्ये मागील काही काळापासून जुना वाद सुरू असल्याची माहिती आहे. याच वादातून त्यांच्यात सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. काही वेळातच हा वाद वाढत गेला आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली.

  • 28 Sep 2026 10:15 AM (IST)

    28 Sep 2026 10:15 AM (IST)

    Manoj Jarange Ally Sand Mining Fine: मनोज जरांगे पाटलांच्या कोअर कमिटी सदस्य संजय कटारेंचा ४.९० कोटींचा अवैध वाळू दंड कायम

    Manoj Jarange Ally Sand Mining Fine:   मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीतील सदस्य संजय कटारे यांना अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मोठा धक्का बसला असून, त्यांच्यावरील तब्बल ४ कोटी ९० लाख रुपयांचा दंड उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी कायम ठेवला आहे. गोदावरी पात्रातून सुमारे २००० ब्रास अवैध वाळूचे उत्खनन केल्याच्या आरोपावरून अजय महाराज बारस्कर यांनी केलेल्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कटारे यांना यापूर्वी तहसीलदारांनी दंडातून वगळले होते, मात्र तो आदेश रद्द करत आता उपविभागीय अधिकाऱ्यांनी या कोट्यवधींच्या दंडाच्या वसुलीचे थेट निर्देश दिले आहेत.

  • 28 Sep 2026 10:05 AM (IST)

    28 Sep 2026 10:05 AM (IST)

    Panjabrao Dakh Rain Forecast: राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाच २९ अन् ३० सप्टेंबरला पावसाचा अंदाज 

    Panjabrao Dakh Rain Forecast:  पावसाळा सुरू होऊन चार महिने उलटले तरी राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हुलकावणी दिल्याने पिके करपून गेली असून, सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यातील पावसाची नेमकी स्थिती स्पष्ट केली आहे. सध्या संपूर्ण राज्यात सार्वत्रिक पावसासाठी अनुकूल परिस्थिती नसली तरी २९ आणि ३० सप्टेंबर रोजी नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांसह इंदापूर, बारामती, शिर्डी, कोपरगाव, येवला व मनमाड या स्थानिक पट्ट्यांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

  • 28 Sep 2026 09:55 AM (IST)

    28 Sep 2026 09:55 AM (IST)

    Bank Employees Strike Postponed: देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप अखेर स्थगित 

    Bank Employees Strike Postponed:   देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान पुकारलेला तीन दिवसांचा देशव्यापी संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यात संप सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी रात्री उशिरा पार पडलेल्या बैठकीत विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीनंतर संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून उद्यापासून २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान देशातील सर्व बँकांचे कामकाज नियमित व पूर्ववत सुरू राहणार आहे.

  • 28 Sep 2026 09:45 AM (IST)

    28 Sep 2026 09:45 AM (IST)

    Lohagad Agrawal Death Case: लोहगडाच्या कड्यावरून केतन अग्रवाल दरीत कसा कोसळला?  

    Lohagad Agrawal Death Case: लोहगडाच्या कड्यावरून केतन अग्रवाल दरीत कोसळल्याच्या प्रकरणात पोलिसांच्या हाती दोन अत्यंत महत्त्वाचे धागेदोर लागले असून, या घटनेमागील गूढ उकलण्यास मदत होत आहे. एका प्रत्यक्षदर्शीने केतनला कड्यावरून दरीत ढकलल्याचे स्पष्टपणे पाहिल्याचा दावा पोलिसांकडे दिलेल्या जबाबात केला असून, घटना पाहिल्यानंतर जाब विचारणाऱ्या या प्रत्यक्षदर्शीलाच आरोपींनी 'शांत बस, नाहीतर तुलाही किल्ल्यावरून फेकून देईन' अशी थेट जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रत्यक्षदर्शीच्या महत्त्वाच्या दाव्यासोबतच पोलिसांनी गोळा केलेल्या तब्बल १२ टीबीच्या डिजिटल डेटाच्या विश्लेषणातून या प्रकरणाशी संबंधित अनेक नवे दुवे आणि धागेदोरे उघडकीस येत आहेत.

  • 28 Sep 2026 09:35 AM (IST)

    28 Sep 2026 09:35 AM (IST)

    Nagpur Police ASAI Death: ग रात्रभर ड्युटी करून घरी परतलेल्या नागपूरच्या एएसआयचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

    Nagpur Police ASAI Death:   नागपूर पोलीस दलातील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) रवींद्र महादेवराव कोकांडे (वय ५६) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (२७ सप्टेंबर) पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ताची रात्रभर ड्युटी पूर्ण करून पहाटे साडेतीनच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या होत्या. ड्युटीवरून आल्यावर लगेचच त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली; या घटनेमुळे पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • 28 Sep 2026 09:25 AM (IST)

    28 Sep 2026 09:25 AM (IST)

    Ladki Bahin Yojana Installment: 'लाडकी बहीण' योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्या आजपासून खात्यात जमा होणार 

    Ladki Bahin Yojana Installment:  'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून, ऑगस्ट महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर आज संपली आहे. राज्य सरकारकडून या हप्त्यासाठी आवश्यक निधी हस्तांतरीत करण्यात आला असून, आजपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये १५०० रुपये जमा होण्यास अधिकृतपणे सुरुवात होत आहे. पुढील दोन दिवसांत हे पैसे खात्यात जमा होणार असल्याने सर्व लाभार्थी महिलांना आपल्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे की नाही हे तपासून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 28 Sep 2026 09:15 AM (IST)

    28 Sep 2026 09:15 AM (IST)

    Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला

    Harshvardhan Sapkal : निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत राहुल गांधींवर करण्यात येणाऱ्या टीकेवरून सवाल उपस्थित केला आहे. ‘फडणवीस निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का?’ असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.

  • 28 Sep 2026 09:05 AM (IST)

    28 Sep 2026 09:05 AM (IST)

    Share Market Today: लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार

    India Share Market Update: सोमवार, २८ सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजार आज लाल रंगात उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीने देखील आज सपाट ते मंद सुरुवातीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आज शेअर बाजारात व्यवहार करताना सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी गुंतवणूकदारांना १०० रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी ५ शेअर्सची शिफारस केली आहे. सुमित बगाडिया यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये लॉयड्स एंटरप्रायझेस, बजाज हाउसिंग फायनान्स, बँक ऑफ महाराष्ट्र, जीएमआर एअरपोर्ट्स आणि आरबीए यांचा समावेश आहे.

Maharashtra to World Breaking News : 

आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली.  आशियाई खेळामध्ये १८ वर्षीय अनाहत सिंगने स्क्वॉशमध्ये रौप्य पदक पटकावले, तर भारतीय पुरुषांच्या कबड्डी संघाने सुवर्णपदकावर नाव कोरले. रायगड जिल्ह्यातील महाड MIDC मध्ये भीषण स्फोट घडल्याची घटना घडली, तर भाईंदर खाडीकिनारी कृत्रिम तलावांचे उभारणी काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. 

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट, तर पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार राज्यात पावसाची काही काळ विश्रांती राहण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

Web Title: Maharashtra and india breaking news live updates 28 september 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

Justice Vikram Nath Next CJI: कोर्टाचे लाइव्ह-स्ट्रीमिंग सुरू करणारे पहिले न्यायाधीश! न्यायमूर्ती विक्रम नाथ होणार नवे CJI
2

Justice Vikram Nath Next CJI: कोर्टाचे लाइव्ह-स्ट्रीमिंग सुरू करणारे पहिले न्यायाधीश! न्यायमूर्ती विक्रम नाथ होणार नवे CJI

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
3

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
4

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.