
Top Marathi News Today Live : पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ; ममता बॅनर्जींनाच 'तृणमूल'च्या अध्यक्षपदावरून काढले
खरा मुद्दा मतदारसंघ पुनर्रचना आहे, महिला आरक्षण नाही असे म्हणत सोनिया गांधी यांनी एका लेखाद्वारे सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोनिया गांधी यांनी म्हटले की, महिला आरक्षणाबाबत कोणताही वाद नाही. ते २०२३ मध्ये मंजूर झाले होते. महिला आरक्षणाची अंमलबजावणी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडली गेली होती, परंतु विरोधी पक्षांनी त्याला तीव्र विरोध केला. विरोधी पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अंमलबजावणीची मागणी केली होती, परंतु सरकारने त्यावेळी ते मान्य केले नाही.
वाचा अधिक बातम्या….
13 Apr 2026 07:03 PM (IST)
Tata IPL 2026 SRH Vs RR Live Toss Updates: आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मॅच होणार आहे. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची तूफान फलंदाजी आज चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
13 Apr 2026 06:50 PM (IST)
सामन्यादरम्यान ‘डगआउट’मध्ये बसलेले असताना राजस्थान रॉयल्सच्या संघाच्या व्यवस्थापकाने (Team Manager) मोबाईल फोन वापरल्यामुळे निर्माण झालेला वाद आता चिघळत चालला आहे. या घटनेमुळे झालेल्या गदारोळानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) यावर कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार, BCCI ने रॉयल्सचे संघ व्यवस्थापक रोमी भिंदर यांना नोटीस बजावली असून, त्यांनी मोबाईल फोन का वापरला याविषयी स्पष्टीकरण मागितले आहे. मंडळाच्या ‘भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा विभागाने’ (ACSU) ही नोटीस त्यांना पाठवली आहे.
13 Apr 2026 06:43 PM (IST)
अमरावती : महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेली ही योजना महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली. त्यावेळी या योजनेचे मानधन १५०० रुपयांपासून ते २१०० रुपयांपर्यंत करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही खात्यात १५०० रुपयेच जमा होत असल्याने लाभार्थी महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मानधन वाढविण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी ही बाढ नेमकी कधीपासून लागू होणार याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही. उलट सरकारकडून लाभार्थ्यांची आर्थिक पडताळणी आणि अर्जाची फेरतपासणी सुरू करण्यात आली.
13 Apr 2026 06:34 PM (IST)
कल्याण: कल्याण शहरात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेला (Sports News)खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणमधील फायनल, क्रमांक सहाच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक उमेश बोरगावकर, नगरसेवक संकेत भोईर, नगरसेविका स्वप्नाली केने, नगरसेविका अर्पणा भोईर यांनी आयोजित केला होता. देशभरातून सहभागी झालेल्या संघांनी अत्यंत चुरशीचे सामने खेळत प्रेक्षकांचे मनोरंजन केले .पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात हरियाणा संघाने दमदार खेळ करत विजेतेपद पटकावले. तर महिला गटात जबलपूर संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
13 Apr 2026 06:26 PM (IST)
Cabinet Meeting Decision News In Marathi : राज्य सरकारने शासकीय पदांसाठीची भरती प्रक्रिया सुधारण्याचा निर्णय घेतला असून, ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ च्या दूरदृष्टी दस्तऐवजानुसार पहिली कार्यवाही करण्यात आली आहे. MPSC मार्फत विविध सेवांअंतर्गत संवर्गांची संख्या ५३ वरून १५३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि काही नवीन सेवांचा संयुक्त परीक्षा योजनेत समावेश केला जाईल. त्यामुळे एमपीएससी भरती प्रक्रिया अधिक सुलभ होईल.
13 Apr 2026 06:16 PM (IST)
भारतीय संगीताच्या सुवर्णयुगाचा आज अंत झाला. संगीत राणी आशा भोसले यांचे रविवारी निधन झाले. सोमवारी, 13 एप्रिल रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी डोळ्यात अश्रू आणि जड अंतःकरणाने चितेला अग्नी दिला. तिरंग्यात गुंडाळलेल्या त्यांच्या पार्थिवाला अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. अनु मलिक आणि अनुप जलोटा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी अंत्यविधीला उपस्थित होते.
13 Apr 2026 06:08 PM (IST)
IPL 2026: काल म्हणजेच 12 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 18 रन्सने पराभव झाला. आरसीबीने प्रथम फलंदाजी केली. फलंदाजी करताना टीम डेव्हिडचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो स्वतः बॉलचे शेप तपासत असल्याचे दिसत आहे. यामुळे आता त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
13 Apr 2026 05:55 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या पिसर्वे (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर आरोग्य केंद्राचे अतिक्रमण अखेर ‘फिक्स’ झाले आहे. राजकीय हस्तक्षेपाने अखेर चिमुकल्यांच्या मैदानाचा घास घेतला. प्रचंड विरोध व वादविवादानंतर शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचा तीव्र विरोध असताना देखील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरु करण्यात आले आहे. मुलांच्या हक्काच्या मैदानावर होत असलेल्या सरकारी अतिक्रमणामुळे पालक संतप्त झाले असून, त्यांनी पुरंदरच्या गट विकास अधिकारी यांच्याकडे विशेष ग्रामसभेची मागणी केली आहे.
13 Apr 2026 05:40 PM (IST)
सेलू शहरातील एका ७० वर्षीय निवृत्त शिक्षकाला ‘डिजिटल अरेस्ट’ची (Cyber Crime) भीती दाखवून सायबर भामट्यांनी तब्बल ९७ लाख ८३ हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सेलु पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात या घटनेने खळबळ उडाली आहे.
13 Apr 2026 05:34 PM (IST)
राज्य सरकारने ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या सांगीतिक दृष्टिकोनाला पुढे नेण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आशा भोसले यांनी कल्पिलेल्या संकल्पनेवर आधारित एक संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सरकार सक्रिय उपाययोजना करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी केली.
13 Apr 2026 05:01 PM (IST)
Mahindra कडून उपलब्ध असलेली Thar SUV आता अधिक किमतीत मिळणार आहे. एप्रिल 2026 मध्ये कंपनीने तिच्या किमतीत वाढ केली असून ही वाढ काही विशिष्ट व्हेरिएंट्सपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने या SUV च्या किमतीत जास्तीत जास्त 43500 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. मात्र, ‘बेस व्हेरिएंट’च्या किमतीत मात्र कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही.
13 Apr 2026 04:50 PM (IST)
अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील प्रत्येक घराकडून कचरा संकलनासाठी वार्षिक ६०० रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारा असल्याचे विरोधकांनी म्हंटले आहे. महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांमध्ये घराघरातून कचरा संकलनासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जात नाही. हा खर्च मालमत्ता कर आणि इतर स्थानिक करांमधून भागवला जातो. त्यामुळे अकोल्यात अशा प्रकारचे शुल्क लादणे अन्यायकारक असल्याची भावना विरोधकांनी व्यक्त केली आहे.तसेच, शहरातील कचरा व्यवस्थापन सेवाही अद्याप पूर्णपणे व्यवस्थित नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. अनेक भागांमध्ये कचरा वेळेवर उचलला जात नाही, घंटागाडी नियमित येत नाही, तसेच स्वच्छतेचे नियोजन प्रभावी नसल्याचेही निदर्शनास आणण्यात आले आहे. त्यामुळे कचरा घंटागाडी नागरिकांना निशुल्क देण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.नागरिक प्रतिनिधींनी या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत विरोध करण्याचे आवाहन केले असून, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांचे मत, आक्षेप आणि सूचना विचारात घेण्याची मागणी केली.
13 Apr 2026 04:45 PM (IST)
एकीकडे 'स्मार्ट सिटी'च्या गप्पा, तर दुसरीकडे नरकयातना! हे वास्तव आहे मुंबईलगतच्या असणाऱ्या वसई विरार शहरातील नालासोपारा पूर्वेतील कारगिल नगर या परिसरातील दाट वस्त्यांचं. जिथे नाल्याला आता कचराकुंडीचं स्वरूप आलंय , त्याच फुलांवरून लोकांचं ये जा धक्कादायक म्हणजे, याच दुर्गंधीयुक्त नाल्याशेजारी नागरिक आपला दिवस घालवतात आणि लहान मुलं खेळतात. डेंग्यू आणि मलेरियाचा धोका उंबरठ्यावर असतानाही प्रशासन मात्र ढिम्म आहे.
13 Apr 2026 04:40 PM (IST)
गेल्या अनेक महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण आणि अर्थकारण अवलंबून असणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या बोगस दूध संस्थाचं प्रकरण चर्चेत आहे.यातच गोकुळ दूध संघातील गैरव्यवहाराची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपचे सहयोगी आमदार शिवाजी पाटील यांनी केलीये.चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी चौकशीची मागणी केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे..एका बड्या मंत्र्याच्या आशीर्वादाने गोकुळ मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार पाटील यांचा केलीय. त्यामुळे गोकुळ दूध संघावर तातडीने प्रशासक नेमण्यासाठी लवकरच आमदार शिवाजी पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत..तत्कालीन विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी 3,700 नवीन दूध संस्थांच्या नोंदणीला मंजुरी दिली होती.या मंजुरीची आणि इतर गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केलीये.
13 Apr 2026 04:35 PM (IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दरे भागातील सुरू असलेल्या पुलाच्या कामांची पाहणी केली. आज दिवसभर धाराशिव आणि पंढरपूर दौरा आटोपून संध्याकाळी दरे येथे परतल्यानंतर त्यांनी थेट घटनास्थळी भेट देत कामाचा आढावा घेतला. रात्रीच्या अंधारातही सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या पुलाच्या कामामुळे स्थानिकr नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या पाहणीमुळे प्रशासनही सतर्क झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
13 Apr 2026 04:30 PM (IST)
मोनालिसाचा पती, फरमान खानने, सोशल मीडियाद्वारे तिच्या बेपत्ता झाल्याची घोषणा केली. एका व्हिडिओ संदेशात, फरमानने सांगितले की मोनालिसा अचानक बेपत्ता झाली आहे. तो सध्या राजस्थानमध्ये तिचा शोध घेत आहे. त्याने सांगितले की, त्याने अजमेरमध्ये तिचा शोध घेतला असून आता तो जोधपूरकडे जात आहे. फरमानने जनतेला आणि त्याच्या चाहत्यांना आवाहन केले आहे की, जर कोणाकडे मोनालिसाबद्दल काही माहिती असेल, तर त्यांनी तात्काळ त्याच्याशी संपर्क साधावा. असे समजते की, मोनालिसा आणि फरमानने ११ मार्च रोजी केरळमधील एका मंदिरात हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले होते आणि नंतर त्यांनी त्यांच्या कोर्ट मॅरेजला दुजोरा दिला होता.
13 Apr 2026 04:25 PM (IST)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उद्या संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात भीमजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, बाजारपेठांमध्ये 'भीमगर्जना' पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी निळे झेंडे, बॅनर आणि स्टिकर्सनी दुकाने सजली असून खरेदीसाठी भीमअनुयायांची मोठी गर्दी होत आहे.
जयंतीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्याच्या मुख्य बाजारपेठांमध्ये उत्सवाचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी लगबग पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने खालील वस्तूंना मोठी मागणी आहे:आमचे प्रतिनिधी पोपट पिटेकर यांनी जिल्ह्यातील मुख्य चौकांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये फिरून आढावा घेतला असता, असे दिसून आले की केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही जयंतीची तयारी पूर्ण झाली आहे. मंडळांकडून मोठमोठे स्वागत कमान आणि डिजिटल बॅनर्स लावण्यात आले आहेत. प्रशासनानेही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
13 Apr 2026 04:25 PM (IST)
पालघरमध्ये सोशल मीडियाद्वारे फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट हिंदू नावाने इंस्टाग्राम अकाउंट तयार करून आरोपीने 29 वर्षीय महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये उकळले.बीड जिल्ह्यातील राजू सिकंदर शेख याने “अजय म्हस्के” या नावाने बनावट ओळख तयार करत पीडितेशी संबंध प्रस्थापित केले. मंदिरात नेऊन खोटे लग्न केल्याचा दिखावा करत सहा महिन्यांत आर्थिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे.विशेष म्हणजे आरोपीच्या पत्नीने अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत २ लाख रुपयांची खंडणी मागितली. घाबरलेल्या पीडितेने तक्रार दिल्यानंतर केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.पालघर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पुण्यातून अटक केली असून न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात फसवणूक, ब्लॅकमेल आणि खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
13 Apr 2026 04:20 PM (IST)
दापोली तालुक्यात रविवारी, १२ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास हर्णे रस्त्यावरील आसूद बाग बसस्टॉपच्या वळणावर दोन कारमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, हर्णेकडून दापोलीच्या दिशेने येणारी एक कार अतिवेगात होती. वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ही कार दापोलीकडून हर्णेकडे जाणाऱ्या समोरच्या कारवर जोरात आदळली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही कारचे पुढील भाग मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे .अपघातग्रस्त दोन्ही कार पर्यटकांच्या असल्याचे समजते. त्यापैकी एक कार कोल्हापूरहून, तर दुसरी साताऱ्याहून आलेल्या पर्यटकांची होती. एका कारमध्ये प्रवास करणारे संपूर्ण कुटुंब या अपघातातून थोडक्यात बचावले. अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
13 Apr 2026 04:16 PM (IST)
मिरा-भाईंदर : शहरात वाढत्या आग लागण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महानगरपालिकेने अनाधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रभाग क्रमांक ४ मधील विनय नगर परिसरात असलेल्या ‘पंख’ या लग्न मंडपाच्या हॉलवर तोडक कारवाई करण्यात आली.या कारवाईनंतर स्थानिक स्तरावर या लग्न मंडपाचा संबंध भाजपचे माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांच्याशी असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
13 Apr 2026 04:10 PM (IST)
दापोली तालुक्यात रविवारी, १२ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास हर्णे रस्त्यावरील आसूद बाग बसस्टॉपच्या वळणावर दोन कारमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, हर्णेकडून दापोलीच्या दिशेने येणारी एक कार अतिवेगात होती. वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ही कार दापोलीकडून हर्णेकडे जाणाऱ्या समोरच्या कारवर जोरात आदळली.
13 Apr 2026 03:50 PM (IST)
जागतिक राजकारणाच्या पटावर भारत आता एक महासत्ता म्हणून वेगाने उदयास येत आहे. नुकताच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) दौरा पार पडला आणि या दौऱ्याने संपूर्ण मध्य-पूर्वेत (Middle East) भारताची प्रतिमा एका ‘शूर आणि विश्वासू’ मित्राची बनली आहे. यूएईचे प्रसिद्ध राजकीय विश्लेषक अमजद ताहा यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने आता जगभरात चर्चा सुरू केली आहे. ताहा यांच्या मते, भारत हा एक असा देश आहे ज्याला इस्लामिक जिहादी दहशतवादी घाबरतात आणि हाच भारत भविष्यात जगाला नवी दिशा दाखवेल.
13 Apr 2026 03:45 PM (IST)
मराठी मोळी अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ते म्हणजे मटका किंग यातील तिच्या पात्रामुळे. सई ताम्हणकर ही नेहमीच अशा महिला पात्रांकडे आकर्षित झाली आहे. ज्यांच्यात एक जिद्द असते, स्वतःचा आवाज असतो आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची ताकद असते. प्राइम व्हिडिओवरील ‘मटका किंग’मधील बरखा अगदी तशीच आहे. अतिशय स्वतंत्र विचारांची, स्वतःबद्दल जागरूक आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणारी बरखा ही कथा वाचताच सईंच्या मनात घर करून गेली. एका कलाकारासाठी जो नेहमीच सखोल भूमिकांच्या शोधात असतो, हा रोल खूप वेगळा ठरला. येथे सई त्या पात्राबद्दल मनमोकळेपणाने बोली आहे, ज्याने तिला अक्षरशः वेड लावले.
13 Apr 2026 03:40 PM (IST)
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता १०वी परीक्षा २०२६ (सत्र १) चा निकाल या आठवड्यात कोणत्याही दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे. खरे तर, यावर्षी निकाल गेल्या वर्षीपेक्षा थोडा लवकर जाहीर होणार आहे. दरवर्षी हा निकाल साधारणतः मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागतो असं दिसून येतं. पण यावर्षी पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात १०वी चा हा निकाल लागणार आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षी इयत्ता १०वी च्या बोर्ड परीक्षा दोनदा होणार आहेत. पहिले सत्र आधीच पार पडले असून, निकाल जाहीर झाल्यानंतर दुसरे सत्र मे महिन्यात घेतले जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा देणे सोपे होईल म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना त्यांची मार्केशीट कधी आणि कुठे पाहता येईल हे आपण जाणून घेऊया.
13 Apr 2026 03:30 PM (IST)
उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बंद घरामध्ये तब्ब्ल चार महिन्यानंतर एका ३४ वर्षीय तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळला आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, तरुणीच्या मृत्यूनंतर तिचे वडील त्याच मृतदेहासोबत घरात राहिले आणि त्यांनतर घराला कुलूप लावून फरार झाले. ही घटना उत्तरप्रदेश येथील मेरठमध्ये घडली.
13 Apr 2026 03:20 PM (IST)
अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी होर्मुझची नाकेबंदी करण्याची घोषणा केली आहे. मात्र ट्रम्प यांच्या या भूमिकेला ऑस्ट्रेलियाने नकार दिला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी इराणविरुद्धच्या कोणत्याही लष्करी कारवाई सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
13 Apr 2026 03:15 PM (IST)
महाराष्ट्रातील नाशिकमधून समोर आलेले भोंदू बाबा उर्फ अशोक खरातचे प्रकरण आता देशातील सर्वात मोठ्या लैंगिक तस्करी आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणांपैकी एक बनले आहे. तंत्र-मंत्र आणि भविष्यवाणीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग करणे आणि लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर बनले आहे. आता अंमलबारी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणात प्रवेश केल्याने तपास आणखी तीव्र झाला आहे. ईडीने अशोक खरातच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत.
13 Apr 2026 03:10 PM (IST)
वजन करण्याऱ्यांसाठी वजन काट्यावर उभं राहिल्यानंतर आलेले वजन पाहून अनेकांना धक्काच बसतो. झपाट्याने १ किंवा २ किलो वजन वाढल्यानंतर चिंता व्यक्त केली जाते. पण हे अचानक वाढलेले वजन नसून शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये साचून राहिलेले पाण्याचे प्रमाण आहे. शरीराच्या हात, पाय, घोटे आणि पोटाच्या भागात सूज जाणवण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याकडे कायमच दुर्लक्ष केले जाते.
13 Apr 2026 03:05 PM (IST)
आजकाल चहाच्या टपरीपासून ते मोठ्या मॉल्सपर्यंत सर्वत्र UPI द्वारे पेमेंट केले जाते. सध्याच्या काळात ही पेमेंटची प्रमुख पद्धत बनली आहे. मात्र, अनेकदा घाईत एक आकडा चुकला तरी तुमचे कष्टाचे पैसे कोणा भलत्याच्याच खात्यात जमा होतात. युझर्सना नेहमी प्रश्न पडतो की, व्हॉट्सॲप किंवा ईमेलप्रमाणे UPI मध्येही पाठवलेले पैसे परत घेता येतील का? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात
13 Apr 2026 02:57 PM (IST)
सोलापूर जिल्हा नियोजन समितीची यापूर्वी २०१७ मध्ये निवडणूक झाली होती. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद/नगरपंचायतींची २०२१-२०२२ मध्ये मुदत संपल्याने डीपीसीवरील नियुक्त्याही संपुष्टात आल्या होत्या. आता जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद/नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्याने डीपीसीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
13 Apr 2026 02:50 PM (IST)
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार शिवाजीराव पाटील यांनी केला आहे. या प्रकरणाची 'ईडी' मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. ३७०० नव्या संस्थांच्या नोंदणीवरही संशय व्यक्त करत प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात आली असून, ते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
13 Apr 2026 02:42 PM (IST)
कल्याण - मुरबाड - नगर महामार्गावर रायते गावाजवळ एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एका सिमेंट मिक्सर ट्रक आणि प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या इको (काळी पिवळी) मध्ये हा जबरदस्त अपघात झाला आहे. या अपघाताचे अतिशय भयावह असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
13 Apr 2026 02:35 PM (IST)
दिल्ली विधानसभेला बॉम्बने उडवून देण्याचा ईमेल आला आहे. सकाळी ११ च्या सुमारास आला ईमेल आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत संपूर्ण तपास सुरु आहे. नेमका हा मेल कुठुन आलाय हे स्पष्ट झालेलं नाही.
13 Apr 2026 02:27 PM (IST)
रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांच्या सोयी-सुविधांचा विचार केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर इको-टॉयलेट विथ बायो डायजेस्टर आणि चेंजिंग रूम्सची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी सुरुवातीला १ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. त्यानंतर या विकासाला अधिक गती देण्यासाठी आता ४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली.
13 Apr 2026 02:21 PM (IST)
अशोक खरात यांच्यावर ED ने PMLA अंतर्गत नाशिक, पुणे व शिर्डीत 11 ठिकाणी छापे टाकले. खंडणी, धार्मिक फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराचे आरोप समोर आले आहेत. बोगस खात्यांद्वारे पैशांची उकळपट्टी करून ती रक्कम जमिनीत गुंतवल्याचा संशय असून, तपासात महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे.
13 Apr 2026 02:00 PM (IST)
निसर्गरम्य नेपाळ सध्या एका अशा संकटात सापडला आहे, ज्याचे मूळ शेजारील देश चीनच्या ‘कर्जसापळ्यात’ (Debt Trap) दडलेले आहे. नेपाळची सरकारी विमान कंपनी ‘नेपाळ एअरलाईन्स’ (Nepal Airlines) आज अस्तित्वाच्या लढाईला सामोरी जात आहे. चीनकडून घेतलेली विमाने नेपाळसाठी मदतीचा हात ठरण्याऐवजी गळ्याचा फास बनली आहेत. तब्बल ५० अब्ज रुपयांचे कर्ज आणि विमानांची दुरवस्था यामुळे काठमांडू विमानतळावर चिनी बनावटीची ही विमाने आज केवळ ‘पांढरा हत्ती’ म्हणून उभी आहेत.
13 Apr 2026 01:55 PM (IST)
१२ एप्रिल २०२६ रोजी आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला आणि त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शोकसंदेश पाठवले. अनेक नामवंत कलाकार, गायक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. पण याच दरम्यान, एका ३३ वर्षीय अभिनेत्रीने एक मोठी चूक केली: तिने आशा भोसले यांच्याऐवजी लता मंगेशकर यांचा फोटो अपलोड केला. या मोठ्या चुकीमुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलच फटकारले आहे.
13 Apr 2026 01:45 PM (IST)
कल्याण अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला असून, या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. इको कार आणि मिक्सरची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी स्थानिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.
13 Apr 2026 01:35 PM (IST)
जर तुम्ही कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि आता तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. उच्च न्यायालयाने Civil Judges म्हणजे ज्युनिअर डिव्हिजन पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाणार असून, नेमकी कधीपर्यंत अर्ज सादर करण्याची मुभा आहे? जाणून घेऊयात सविस्तर
13 Apr 2026 01:30 PM (IST)
बीड जिल्ह्यातील केज शहरात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नराधम सावत्र पित्याने आपल्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे.
13 Apr 2026 01:25 PM (IST)
भारतात शाओमी फॅन फेस्टिवल सुरु झाला आहे. हा फेस्टिवल 15 एप्रिलपर्यंत सुरु राहणार असून यादरम्यान ग्राहकांना स्मार्टफोन आणि स्मार्ट टिव्ही अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कंपनी शाओमी फॅन फेस्टिवलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन आणि स्मार्ट टिव्हीच्या खरेदीवर आकर्षक डिस्काऊंट ऑफर करत आहे. Mi.com आणि अॅमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मवर कंपनीच्या डिल्स आणि ऑफर्स उपलब्ध आहे. लोकं त्यांच्या आवडीचे डिव्हाईस अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत.
13 Apr 2026 01:15 PM (IST)
दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून येणार आहेत. जोरदार राजकारण झाल्यानंतर काँग्रेसने अर्ज मागे घेतला. त्यामुळे सुनेत्रा पवारांविरोधात कोणताही प्रबळ नेता नसल्याने त्या निवडणूक जिंकणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याची व पक्षाची सुत्रे हाती घेत उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. मात्र त्या लवकर मुख्यमंत्री होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये (Maharashtra Politics) रंगली आहे.
13 Apr 2026 01:07 PM (IST)
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ अत्यंत मजेशीर, तर काही व्हिडिओ पाहून काळाजाचा ठोकाच चुकतो. सध्या असाच एक युद्धाचे भीषण वास्तव दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इस्रायल-हमास युद्धामुळे गाझातील भायनक वास्तव या व्हिडिओत दिसत आहे. यामध्ये काही चिमुकल्या एका बाहुलीची अत्यंत यात्रा काढताना दिसत आहे.
13 Apr 2026 01:02 PM (IST)
गेल्या अनेक वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि धूळ खात पडलेल्या ओतूर येथील ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या १ मे (महाराष्ट्र दिनी) रोजी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या अद्ययावत रुग्णालयाचे लोकार्पण होणार असल्याची घोषणा जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी केली आहे. या निर्णयामुळे जुन्नर तालुक्यातील उत्तर भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला असून, स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने अखेर वेगाने हालचाली केल्या आहेत.
13 Apr 2026 12:45 PM (IST)
मुंबईमध्ये विविध पत्रकार परिषदा आणि बैठकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत पुरंदर विमानतळ प्रकल्प करणारच अशी ठाम भूमिका घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदरमध्ये येवूनही मौन बाळगले आहे. ज्या गावात प्रकल्प करणार आहात त्या गावात आल्यानंतर त्याविषयी बोलणे अपेक्षित असताना मात्र पूर्णपणे मौन बाळगल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. खानवडी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच्यासह जवळपास निम्मे मंत्रिमंडळ आणि आमदार, खासदार उपस्थित होते.
13 Apr 2026 12:25 PM (IST)
विद्यार्थी आणि शिक्षकाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. विनयभंगाच्या मानसिक धक्क्यातून ‘बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ (BSI) मधील एका पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित प्राध्यापकाला तातडीने अटक केली असून शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये आपल्या संशोधनाचे (Ph.D.) काम करत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संबंधित प्राध्यापकाकडून तिचा मानसिक छळ आणि विनयभंग होत होता. या सततच्या त्रासामुळे आणि आलेल्या मानसिक दडपणातून तिने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर, पोलिसांनी पुराव्यांच्या आधारे संबंधित नराधम प्राध्यापकाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडितेने आत्महत्येपूर्वी काही चिठ्ठी लिहिली आहे का, किंवा इतर काही डिजिटल पुरावे आहेत का, याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. या घटनेमुळे संशोधक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपी प्राध्यापकावर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक स्तरातून होत आहे.
13 Apr 2026 12:10 PM (IST)
सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठाची मोबाइल ‘हॅक’ (तांत्रिक ताबा) करून बँक खात्यातून ७ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रादार ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागात राहायला आहेत. तक्रारदारांचा बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठविली. ही लिंक उघडताच चोरट्यांनी त्यांचा मोबाइल ‘हॅक’ केला. ज्येष्ठाच्या बँक खात्यातून चोरट्यांनी रोकड लांबविली. वरिष्ठ निरीक्षक कदम तपास करत आहेत.
13 Apr 2026 11:55 AM (IST)
जागतिक राजकारणातील तणावाने आता टोक गाठले आहे. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणमधील हाय-व्होल्टेज वाटाघाटी कोणत्याही निर्णयाविना संपल्या आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणचे प्रभावशाली नेते मोहम्मद बागेर गालिबाफ यांच्यातील चर्चेत एकमत न झाल्याने अमेरिकेने आता सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) पूर्णपणे लष्करी नाकेबंदी जाहीर केली आहे. मात्र, इराणने याला घाबरण्याऐवजी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर घाला घालणारा ‘गणितीय इशारा’ देऊन सर्वांना चकित केले आहे.
13 Apr 2026 11:45 AM (IST)
एका पती-पत्नीच्या खाजगी वादारे रुपांतर जाहीर तमाशामध्ये झाले आहे. वाद सुरु असताना महिलेने असे काही केले आहे पाहून आसपासचे सर्वजण हादरले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशरह येथे घडली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की महिला पतीच्या दुचाकीवर दगडफेल करताना दिसत आहे. महिला अतिशय संतापलेली असून तिने दुचाकीचे तुकडे केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जोडपे प्रवासासाठी निघाले होते. यावेळी कोणत्यातरी मुद्द्यावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला. हा वाद एवढा वाढला की पत्नीने थेट रस्त्याच्या मधोमध गाडी थांबलली. दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरु होता. पतीने अचानक दुचाकी तिथेच सोडली आणि तो निघून गेला. यानंतर महिलेने संतापून पत्नीच्या गाडीवर दगडफेकण्यास सुरुवात केली.
13 Apr 2026 11:35 AM (IST)
दिल्लीतील लाल किल्ला हा भारताच्या समृद्ध इतिहासाचा एक साक्षीदार मानला जातो. लाल किल्ल्याने मुघलशाहीपासून स्वतंत्र भारताचा इतिहास पाहिला आहे. शाहजहान याने इ.स. 1638 मध्ये या किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली होती. सुमारे 10 वर्षांच्या कालावधीत उभारण्यात आलेल्या या भव्य किल्ल्याचे काम इ.स. 1648 मध्ये पूर्ण झाले. लाल वाळूच्या दगडांपासून तयार झाल्यामुळे याला ‘लाल किल्ला’ हे नाव देण्यात आले.