
Maharashtra breaking News Marathi
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटले तरी, अद्याप मुंबईला नवीन महापौर मिळू शकलेला नाही. महापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत ओढाताणीमुळे महायुतीमधील पेच अधिकच गडद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी लावून धरली आहे. तसेच स्थायी समितीसह अन्य महत्त्वाच्या समित्यांमध्येही शिवसेनेला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, असा त्यांचा आग्रह आहे. मात्र, भाजपने या मागण्यांबाबत अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.
27 Jan 2026 04:50 PM (IST)
नवी मुंबईत पोलीसांनी धाड टाकली. तेव्हा घरात महिला एकटी झोपलेली होती. महिला पोलीस कर्मचारी पण सोबत होते. बांगलादेशची असणारी पण गेल्या १२ वर्षापासून अस्मा पॉली ही कोपरी गाव इथ राहत आहे. नवी मुंबई कोपरी गाव सेक्टर २६ मध्ये ती राहत होती. मात्र तुझ्यावर कारवाई करणार म्हणून पोलीसांनी या आधी तिच्या मैत्रिणीकडून जवळपास ५ लाख रुपये काढले होते. मात्र घरात कारवाई करत असताना एक एजेंट हा पोलिसांच्या सोबत होता. जेव्हा असमा ला पोलीसांनी गाडीत बसवलं तेव्हा घराची सदा झडती करण्यात आली. मात्र तिने पोलीस तक्रारी जे काही सांगितलं ते मात्र धक्कादायक होते.
27 Jan 2026 04:40 PM (IST)
आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ चा 30 वा सामना भारत १९ वर्षांखालील आणि झिम्बाब्वे १९ वर्षांखालील संघ यांच्यात खेळला जात आहे. बुलावायो येथे खेळल्या जात असेलल्या या सामन्यात झिम्बाब्वे संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या घातक फलंदाजीने इतिहास रचला आहे. त्याने या सामन्यात केवळ २४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आहे. यासह तो आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा तो भारताचा संयुक्त पहिला खेळाडू बनला आहे.
27 Jan 2026 04:35 PM (IST)
राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील कनवास-दारा मार्गावर काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. एका दुचाकीस्वाराचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात पेंढ्याने भरलेला ट्रॅक्टर उलटला आणि चालक त्याखाली गाडला गेला. धक्कादायक म्हणजे, मदत मिळेपर्यंत हा चालक तब्बल अर्धा तासापेक्षा ट्रॅक्टरखाली मृत्यूशी झुंज देत होता. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
27 Jan 2026 04:30 PM (IST)
पॅरीस : फ्रान्स (France) आणि भारताच्या संबंधाला आता नवी दिशा मिळाली आहे. दोन्ही देशांमध्ये आता सांस्कृती संबंधाची पायाभरणी करण्यात येते आहे. फ्रान्समध्ये पहिले हिंदू मंदिर बांधले जाणार असून सोमवारी (२६ जानेवारी २०२६) हिंदू मंदिराच्या अधिकृत बांधकामाला सुरुवात झाली आहे.
27 Jan 2026 04:25 PM (IST)
मीरा भाईंदर येथील फ्लायओव्हर संदर्भात एक व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मेट्रो लाईन ९ प्रकल्पाचा भाग असलेल्या या डबल डेकर फ्लायओव्हरचे उद्घाटन फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार आहे. मनसेने या कामाबाबत आक्षेप घेतला असून हे काम भ्रष्टाचारासाठी आणि काही राजकीय लोकांना फायदा देण्यासाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोप मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी केला आहे. मनसेच्या आरोपानंतर MMRDA ने याबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. काय आहे मनसेचा आरोप? MMRDA ने नक्की काय स्पष्टीकरण दिले आहे
27 Jan 2026 04:20 PM (IST)
सुरेश पाटील व उत्तम भोईर हे प्रचारात सक्रिय झाल्याने माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास सावरोली जि. प. मतदारसंघाचे उमेदवार संतोष बैलमारे यांनी व्यक्त केला आहे.
27 Jan 2026 04:15 PM (IST)
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींवर वन विभागाने कारवाईबाबत नोटीस बजावल्या होत्या. या विरोधात स्थानिक आदिवासी समाज संतप्त झाला होता. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो आदिवासींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरु केले होते. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाई स्थगित करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. या विनंतीनंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने वन अधिकाऱ्यांनी ही कारवाई तात्पुरती स्थगित केली आहे. श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही कारवाई कायमस्वरूपी रद्द करावी आणि आदिवासींच्या जमिनी घरे देखील त्यांच्या नावावर करून द्यावीत अशी मागणी केली आहे.
27 Jan 2026 04:10 PM (IST)
खालापूर तालुक्यात जिल्हापरिषद व पंचायत समितीचा महायुती तर्फे जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारात युवासेना महत्वाची भूमिका पार पाडताना दिसत आहे. खालापूरातील आत्करगाव जिल्हा परिषद गटातील खानाव पंचायत समितीचे महायुतीचे उमेदवार भाई रघुनाथ शिंदे यांचा डोअर टू डोअर प्रचार सुरु आहे.
27 Jan 2026 04:09 PM (IST)
मुकेश मोकाशी यांची ठाणे भाजप गटनेते पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांनी ठाण्यात भाजप शिवसेनेत सुरु असलेल्या अंतर्गत वादावर भाष्य करत ठाण्यात सत्तेचे पद हवे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
27 Jan 2026 04:06 PM (IST)
अहिल्यानगर शहरामध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत भारत भारती संस्थेकडून मंदिर हिंदू आस्था और धरोहर व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महंत रामगिरी महाराज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते...या व्याख्यानामध्ये बोलताना महंत रामगिरी महाराज यांनी श्री क्षेत्र मढी कानिफनाथ मंदिर व गुहा येथील कानिफनाथ मंदिराची वक्फ बोर्डाने दावा सांगितलेल्या जमिनीचा उल्लेख करत वक्फ बोर्ड नसुन हे भूमाफिया बोर्ड आहे..वक्फ बोर्ड चा अर्थ दान दिलेलं जे काही आहे त्याचे व्यवस्थापन करणे..तुम्हाला कोणीही दान दिलं नाही तर ती जमीन तुमची कशी काय झाली असा प्रश्न उपस्थित करत हिंदूंनी देवस्थान जमिनीकडे लक्ष देण्याचे आवाहन महंत रामगिरी महाराज यांनी केले आहे. यावेळी रामगिरी महाराजांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
27 Jan 2026 03:50 PM (IST)
Latur ZP Election 2026: लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तांबळा जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अंजना चौधरी यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. प्रचारासाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आटोपून बाहेर पडल्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चिंता वाटू लागली होती. याप्रकरणी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन अपहरणाबाबत लेखी निवेदन दिले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे अर्ज मागे घेण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विविध तर्कवितर्क लावले जात होते. अशातच एक महत्त्वाची अपडेट मोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी त्या अचानक परतल्या. धक्कादायक बाब म्हणजे २० गाड्यांच्या ताफ्यांसह पोलीस बंदोबस्तात दाखल होत त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसच्या वर्तुळातच एकच खळबळ उडाली आहे.
27 Jan 2026 03:40 PM (IST)
अक्षय कुमार अभिनीत “वेलकम टू द जंगल” या चित्रपटाची चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. चित्रपटाच्या थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची तारीख सतत बदलली जात आहे. तसेच, आता अंतिम प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २०२५ च्या ख्रिसमसच्या दिवशी संपूर्ण कलाकारांचा समावेश असलेली एक झलक दाखवण्यात आली. २०२६ च्या ख्रिसमसच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे अशी घोषणाही करण्यात आली होती. परंतु, तो सहा महिने आधीच प्रदर्शित होणार असल्याचे आता समोर आले आहे.
27 Jan 2026 03:36 PM (IST)
Cabinet Meeting Decision Today News In Marathi: राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक आज (२७ जानेवारी) पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बैठकीत तरुणांना रोजगार, कंत्राटदारांचे थकलेले बिल, सरकारी जमिनीचा भाडेपट्टा कालावधी इत्यादी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली आणि त्या क्षेत्राशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे तरुणांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच राज्य सरकारने बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचे ठरवले आहे.
27 Jan 2026 03:30 PM (IST)
Vikroli News: शहरातील विक्रोळी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळताना एका निष्पाप मुलीचा जीव गेला. एका लहान मुली धावत असताना अचानक रस्त्याच्या कडेला असलेला लाऊडस्पीकर तिच्यावर पडला. स्थानिकांनी तिला रुग्णालयात नेले, परंतु तिचा जीव वाचवता आला नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, ज्यामध्ये लाऊडस्पीकर मुलावर पडताना दिसत आहे. ती मुलगी फक्त तीन वर्षांची होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
27 Jan 2026 03:16 PM (IST)
प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने पद्म पुरस्कार २०२६ यांची अधिकृत घोषणा केली आहे. यंदा देशातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एकूण १३१ प्रतिष्ठित व्यक्तींना भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवण्यात येणार आहे. या पुरस्कारांमध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री या तीन श्रेणींचा समावेश आहे. घोषणेनुसार, यंदा ५ व्यक्तींना पद्म विभूषण, १३ जणांना पद्म भूषण, तर ११३ मान्यवरांना पद्म श्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कला, साहित्य, शिक्षण, समाजसेवा, विज्ञान, क्रीडा, वैद्यकीय सेवा आणि इतर विविध क्षेत्रांत देशासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल म्हणून हे पुरस्कार दिले जातात.
27 Jan 2026 02:44 PM (IST)
अक्षय कुमार अभिनीत "वेलकम टू द जंगल" या चित्रपटाची चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. चित्रपटाच्या थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची तारीख सतत बदलली जात आहे. तसेच, आता अंतिम प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २०२५ च्या ख्रिसमसच्या दिवशी संपूर्ण कलाकारांचा समावेश असलेली एक झलक दाखवण्यात आली. २०२६ च्या ख्रिसमसच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे अशी घोषणाही करण्यात आली होती. परंतु, तो सहा महिने आधीच प्रदर्शित होणार असल्याचे आता समोर आले आहे.
27 Jan 2026 02:40 PM (IST)
प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट निर्माता करण जोहर याने अलीकडेच एक महत्त्वाची घोषणा केली. त्याने संपूर्ण आठवडाभर सोशल मीडियापासून दूर राहून एक आठवडा डिजिटल डिटॉक्स घेण्याचे वचन दिले. त्याने यूनिवर्सला मदतीची विनंती केली आहे. करण जोहरने इंस्टाग्रामवर त्याच्या डिजिटल डिटॉक्सची घोषणा केली. त्याने लिहिले की तो एका आठवड्यासाठी सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर असेल. तो कोणत्याही स्टोरीज किंवा इतर काहीही पोस्ट करणार नाही. शिवाय, तो कोणाच्याही डीएमला उत्तरही देणार नाही.
27 Jan 2026 02:35 PM (IST)
कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत- नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर माणगाव गावच्या हद्दीत असलेल्या गोट फार्म मध्ये आग लागली. या आगीमध्ये तब्बल 400 बकऱ्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या ठिकाणी रात्रीच्या वेळी लागल्याने मदतकार्य मिळण्यात अडचणी आल्या. या आगीची तीव्रता इतकी भयानक होती की, मुख्य प्राण्यांचा बळी यात गेला आहे. दरम्यान गोट फार्मच्या मालकाचे या आगी मध्ये तब्बल दीड कोटींचे आर्थिक नुकसान झाले.
27 Jan 2026 02:30 PM (IST)
मुंबई : कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळसण (पाचुपतेवाडी) परिसरात एम. डी. ड्रग्ज अमली पदार्थ तयार करणारी गुप्त फॅक्टरी कार्यरत असल्याच्या संशयावरून जिल्ह्याबाहेरील विशेष पथकाने मोठी कारवाई केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात ग्रामीण पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील एका जुन्या गुन्हेगाराचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. यावरुन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
27 Jan 2026 02:25 PM (IST)
अमेरिकेत (America) काम करणाऱ्या भारतीयांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. भारतीय कामगारांच्या अमेरिकेत जाण्याबद्दल आता अनिश्चितता निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासाने व्हिसाच्या इंटरव्ह्यू तारखा २०२७ पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. यामुळे मोठा भारतीयांची धांदल उडाली आहे. भारतीयांचा अमेरिकेत जाण्याचा मार्ग जवळपास बंद होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा केला जात आहे.
27 Jan 2026 02:20 PM (IST)
मुंबई: मुंबईतील मालवणी परिसरातून एक दुर्घटना समोर आली आहे. एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने चाळीला आग लागल्याचे समोर आले आहे. या स्फोटात सात जण गंभीर जखमी झाले आहे. ही दुर्दैवी घटना मालवणी गेट क्रमांक ८ जवळ भारतमाता शाळेजवळील एसी मशिदीनजीकच्या चाळीत सकाळी घडली.
27 Jan 2026 02:15 PM (IST)
येत्या १ फेब्रुवारी २०२६ पासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करतील. हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असेल. मागील अर्थसंकल्पात, सरकारने १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला करमुक्त करून मध्यमवर्गाला मोठा दिलासा दिला होता. आता, शेतकरी, व्यापारी, करदाते आणि तरुण हे सर्वजण अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी काय आहे याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
27 Jan 2026 02:02 PM (IST)
ए.आर. रहमान यांनी चित्रपटसृष्टीतील जातीयवादाबद्दल केलेल्या विधानावर वाद सुरूच आहे. त्यांच्या विधानावर सेलिब्रिटींनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणि आता, सुभाष घई यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
27 Jan 2026 01:55 PM (IST)
पुरंदर तालुक्यात पुणे ग्रँड टूर- २०२६’ जागतिक सायकल स्पर्धा नुकत्याच पार पडल्या आहेत. सायकल स्पर्धकांना सायकल चालविणे सोयीस्कर व्हावी यासाठी ज्या मार्गावरून स्पर्धक जाणार आहेत, अशा सर्व रस्त्यांची डागडुजी करून चकाचक केले आहेत. मात्र आता त्याच रस्त्यावरील वाहनांचा वेग प्रचंड दिसत असून, अपघातांची मालिका पुन्हा सुरु झाली आहे.सासवड-सुपे रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही. यामध्ये दोन्ही वाहने वेगात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वाहनांना ब्रेक लागण्यासाठी स्पीड ब्रेकरची (गतिरोधक) आवश्यकता निर्माण झाली आहे.
27 Jan 2026 01:45 PM (IST)
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंह चहल येत्या ३१ जानेवारी निवृत्त होत आहे. पण या निवृत्तीपूर्वीच राज्य सरकारने त्यांच्यावर एक नवी जबाबदारी सोपवली आहे. इकबाल सिंह चहल यांची मुंबई पोलीस गृहनिर्माण टाऊनशिप प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून निवृत्तीनंतर लगेचच ते या पदाची सुत्रे स्वीकारणार असल्याची माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या पदासह चहल यांना राज्य मंत्रीपदाचा दर्जाही देण्यात येणार आहे. इकबाल चहल हे यापूर्व मुंबई महापालिकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. प्रशासकीय क्षेत्रात गेल्या ३६ वर्षांचा कामाचा अनुभव आहे.
27 Jan 2026 01:35 PM (IST)
इराण (Iran) आणि अमेरिकेतील तणावाने गंभीर वळण घेतले आहे. अमेरिकेचे यूएसएस अब्राहम लिंकन कॅरियर स्ट्राइक ग्रुप हिंद महासारगरात सेंटकॉम भागात पोहोचले आहे. यामुळे इराणमध्ये भितीचे वातावरण परसले आहे. इराणवर अमेरिकी हल्ल्याची शक्यता अधिक वाढली आहे. याचा पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई सर्व सुत्रे मुलाच्या हाती सोपवून बंकरमध्ये लपले असल्याचे म्हटले जात आहे.
27 Jan 2026 01:25 PM (IST)
कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळसण (पाचुपतेवाडी) परिसरात एम. डी. ड्रग्ज अमली पदार्थ तयार करणारी गुप्त फॅक्टरी कार्यरत असल्याच्या संशयावरून जिल्ह्याबाहेरील विशेष पथकाने मोठी कारवाई केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात ग्रामीण पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील एका जुन्या गुन्हेगाराचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. यावरुन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
27 Jan 2026 01:21 PM (IST)
देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2026) साजरा करण्यात आला. यानिमित्ताने युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा भारतामध्ये आले आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मेजवानीचे आयोजन केले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात ऐट होम यास्वागत समारंभाचे आयोजन केले होते. मात्र यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जोरदार चर्चा सुरु आहे.
27 Jan 2026 01:15 PM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची मालिका सध्या खेळवली जात आहे. या मालिकेचे तीन सामने आतापर्यत खेळवण्यात आले आहे. या मालिकेच्या तीनही सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आणि मालिका जिंकली आहे. या टी20 मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी न्यूझीलंड संघ टीम इंडियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळत आहे.
27 Jan 2026 01:05 PM (IST)
सध्या सर्वत्र संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या जोडीची चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांना या दोघांची दमदार भूमिका पाहायला मिळणार आहे. लव फिल्म्सने त्यांच्या आगामी थ्रिलर-रहस्यमय चित्रपट “वध २” चा ट्रेलर रिलीज केला आहे. हा चित्रपट जसपाल सिंग संधू यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. ट्रेलरमध्ये रोमांच आणि भावनिक संघर्षांनी भरलेली एक नवीन कथा दाखवण्यात आली आहे, तर प्रमुख घटना अजूनही सस्पेन्समध्ये लपलेल्या आहेत.
27 Jan 2026 01:00 PM (IST)
भिवंडीतील न्यू आझादनगरमध्ये नवरा-बायकोचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या दिलशाद शाह यांच्यावर नातेवाईकांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी दिलशाद यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघे आरोपी ताब्यात.
27 Jan 2026 12:55 PM (IST)
प्रजासत्ताक दिनी मालेगावमध्ये तिरंगी फुगे घेताना नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन लहान मुलांसह पाच जण गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
27 Jan 2026 12:50 PM (IST)
सांगलीत क्षुल्लक कारणातून भीषण हत्या घडली. मावा मागितल्यावरून झालेल्या वादात 28 वर्षीय नारायण पवार याला चाकूने भोसकण्यात आलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एक आरोपी अटकेत असून दोघांचा शोध सुरू आहे.
27 Jan 2026 12:45 PM (IST)
रोहित हा ब्रह्मपुरी येथील एका राईस मिलमध्ये ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याला ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले होते. या खेळात त्याने मोठ्या प्रमाणात पैसे गमावले होते.
27 Jan 2026 12:35 PM (IST)
राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात निर्दयी आईने नवजात बाळ झुडपात टाकले. भटक्या जनावरांच्या हल्ल्यात बाळाचा मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
27 Jan 2026 12:27 PM (IST)
नाशिकच्या गंगापूर रोडवर भरधाव चारचाकीने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याची ‘हिट अँड रन’ घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून कार चालवणारा अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
27 Jan 2026 12:02 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "काल युरोपियन युनियन आणि भारत यांच्यात एक मोठा करार झाला. लोक याला सर्व करारांची जननी म्हणत आहेत. हा करार भारत आणि युरोपमधील लोकांसाठी मोठ्या संधी घेऊन येईल. हे जगातील दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमधील भागीदारीचे एक उत्तम उदाहरण आहे... हा करार जागतिक जीडीपीच्या २५ टक्के आणि जागतिक व्यापाराच्या १/३ भागाचे प्रतिनिधित्व करतो."
27 Jan 2026 11:55 AM (IST)
जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील एका ठिकाणी भारतीय लष्कराचे जवान हे मॉक ड्रील करत आहेत. हे भारतीय जवान ८१ एमएम मोर्टार प्रणालीसह सराव करत आहेत.
#WATCH | Indian Army personnel conduct drill with 81 MM mortar system at a location along LoC in Jammu & Kashmir pic.twitter.com/zDt30ukOGK
— ANI (@ANI) January 27, 2026
27 Jan 2026 11:45 AM (IST)
मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषणामध्ये नाव न घेतल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावर एका महिला पोलिसाने आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. यानंतर गिरीश महाजन यांनी त्यांच्या भाषणाचा जुना व्हिडिओ शेअर करत आंबेडकरी विचार हे आमच्या प्रत्यक्ष कृतीमध्ये असल्याचे सांगितले. महाजन यांनी लिहिले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते... म्हणून आपण आहोत ! महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणे हा भाजपचा संस्कार आहे. आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः सलग ४० वर्षांपासून दरवर्षी आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो, लेझीम खेळतो. आंबेडकरी विचार आमच्या केवळ भाषणात नाही, तर प्रत्यक्ष कृतीतही आहे ! असे गिरीश महाजन यांनी लिहिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते... म्हणून आपण आहोत !
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणे हा भाजपचा संस्कार आहे. आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः सलग ४० वर्षांपासून दरवर्षी आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो, लेझीम खेळतो. आंबेडकरी विचार आमच्या केवळ भाषणात… pic.twitter.com/qNuZ3BcbOy
— Girish Mahajan (@girishdmahajan) January 26, 2026
27 Jan 2026 11:35 AM (IST)
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी राष्ट्रपती भवन येथे 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या "ॲट होम" रिसेप्शनला उपस्थिती लावली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपाध्यक्ष सीपी राधाकृष्णन, युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन आणि इतरही उपस्थित होते.
#WATCH | Delhi: Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi attended the "At Home" reception hosted by President Droupadi Murmu on the occasion of the 77th Republic Day at Rashtrapati Bhavan.
Prime Minister Narendra Modi, Vice President CP Radhakrishnan, European Council… pic.twitter.com/4pUH6VaAoz
— ANI (@ANI) January 26, 2026
27 Jan 2026 11:25 AM (IST)
"शिंदे गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हे वंदनीय आहेत. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला पण शिंदे सेनेकडून निषेधाचा एक शब्द नाही. शिंदे सेनेला बाळासाहेब वंदनीय नसल्याचे राऊत म्हणाले. शिंदेसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे.किती दिवस रुसून बसणार असा सवाल त्यांनी केला. फारतर एखादी साडीचोळी पदरात पाडून घेतली, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे.
27 Jan 2026 11:15 AM (IST)
मंत्री भरतशेठ गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. "एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणार नाही. विकास गोगावलेच्या अंगात भरत गोगावले आणि सुषमा गोगावलेच रक्त आहे. कार्यकर्त्याच्या वाट्याला गेलेलं आपल्याला सहन होत नाही. न्याय देवतेने आदेश दिला म्हणून मी शरण गेलो," असे विकास गोगावले म्हणाले आहेत.
27 Jan 2026 11:05 AM (IST)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपद अनुसूचित जमाती (ST) महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. या आरक्षणामुळे भाजप महापौरपदाच्या शर्यतीतून तांत्रिकदृष्ट्या बाहेर पडला आहे. सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल यांचे नाव सध्या सर्वात आघाडीवर आहे.
27 Jan 2026 10:59 AM (IST)
राजकोषीय तूट म्हणजे सरकारच्या एकूण खर्च आणि त्याच्या एकूण उत्पन्नातील (कर्ज वगळता) फरक. सोप्या शब्दात सांगायचे तर सरकारला त्याचे खर्च पूर्ण करण्यासाठी किती कर्ज घ्यावे लागेल याचे गणित. राजकोषीय तूट ही अर्थसंकल्पातील सर्वात बारकाईने पाहिलेल्या मापदंडांपैकी एक आहे, कारण ती सरकारच्या राजकोषीय शिस्तीचे प्रतिबिंबित करते. कमी राजकोषीय तूट म्हणजेच सरकार त्याचा खर्च आणि महसूल नियंत्रित करत आहे, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवत आहे. दुसरीकडे, उच्च वित्तीय तूट म्हणजे अधिक कर्ज घेणे, ज्यामुळे व्याजदर वाढू शकतात आणि खाजगी गुंतवणुकीवर दबाव येऊ शकतो. शिवाय, ते पायाभूत सुविधा, कल्याणकारी कार्यक्रम आणि संरक्षण यावर खर्च करण्याची सरकारची व्याप्ती निश्चित करते.
27 Jan 2026 10:52 AM (IST)
वर्ल्ड लेजेंड्स प्रो टी२० लीग २६ जानेवारी रोजी सुरू झाली, त्यातील पहिला सामना दिल्ली वॉरियर्स आणि दुबई रॉयल्स यांच्यात खेळला गेला. हरभजन सिंग दिल्ली वॉरियर्सचा कर्णधार होता, तर शिखर धवन दुबई रॉयल्सचा कर्णधार होता. दोन्ही संघांमधील वर्ल्ड लेजेंड्स प्रो टी२० लीग २०२६ चा पहिला सामना गोव्यात खेळला गेला, ज्यामध्ये हरभजन सिंगच्या वॉरियर्सने शिखर धवनच्या रॉयल्सचा पराभव केला. हरभजन सिंगच्या संघाच्या विजयाचा नायक वेस्ट इंडिजचा ४० वर्षीय विकेटकीपर फलंदाज चॅडविक वॉल्टन होता, ज्याने फक्त ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
27 Jan 2026 10:44 AM (IST)
सांगलीतून एक निर्घृण हत्येची बातमी समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून एका २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. फक्त मावा मागितल्याचा रागातून ही घटना घडली. हत्या झालेल्या तरुणाचे नाव नारायण पवार असे आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.
27 Jan 2026 10:37 AM (IST)
मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने ठसा उमटवणारे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते उपेंद्र लिमये लवकरच एका वेगळ्या आणि प्रभावी खलनायकच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘मन आतले मनातले’ या ॲक्शनपॅक्ड मराठी चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका हे चित्रपटाचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला असून, येत्या १३ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जो प्रेक्षकांना सर्व चित्रपटगृहात पाहता येणार आहे.
27 Jan 2026 10:29 AM (IST)
ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंग व आयपीओमध्ये ५० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवत एका खासगी कंपनीतील संगणक अभियंत्या तरुणाची तब्बल ४३ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार ५ डिसेंबर २०२५ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान घडला. मोहन शर्मासह अन्य मोबाईलधारक अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 Jan 2026 10:21 AM (IST)
केंद्र सरकारने २०२६ चा पद्म पुरस्कार जाहीर केला आणि ज्येष्ठ दिवंगत अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना पद्मविभूषण जाहीर केले. या बातमीने केवळ देओल कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण चित्रपटसृष्टीला भावनिक आणि आनंदी झाला आहे. धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळाल्याची बातमी समोर येताच लोकांनी आनंद व्यक्त करणाऱ्या पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली आहे. आता, अनिल शर्मा यांनीही त्यांची आठवण काढून आणि त्यांच्या गौरवशाली वारशाला श्रद्धांजली वाहिली आहे. चित्रपट निर्माते अनिल शर्मा यांनी अलीकडेच धर्मेंद्र यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये, स्टारने त्यांना आठवताना त्यांच्या भावना शेअर केल्या आहेत.
27 Jan 2026 10:12 AM (IST)
जगात अशी अनेक रहस्ये आहेत, ज्यांचा आजपर्यंत उलगडा झालेला नाही. आज मानवाने विज्ञानात, तंत्रज्ञानात मोटी प्रगती केली आहे. परंतु आजही मानवी कर्तृत्वाच्या काही प्राचीन खुणा आपल्याला थक्क करतात.सध्या अशाच एका मोठ्या रहस्याचा उलगडा शास्त्रज्ञांनी केला आहे. ५००- वर्षे जुने असलेले दक्षिण लंडनमधील स्टोनहेंज स्टोन्सतचे मोठे सत्य जगासमोर आले आहे. हे सत्य इतिहासकारांसाठी आणि वैज्ञानिकांसाठी थक्क करणारे आहे.