कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र लोंढे यांनी मार्गदर्शन करताना समाज बांधवांनी संस्कारक्षम शिक्षणाला प्राधान्य देऊन संघटितपणे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन केले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या कार्यातून वंचित समाजाला नवी दिशा दिली असून त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ आंबेडकरवादी कार्यकर्ते दयानंद शिलवंत यांनी महापुरुषांच्या विचारांचे स्मरण ठेवून समाजहिताची वाटचाल करण्याचे आवाहन केले. महापुरुषांचे कार्य व विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले.मल्हारपेठ भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष चंद्रकांत भिसे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्राचा इतिहास सांगितला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जेपी भिसे, पाटण दूध संघाचे संचालक विकास शीलवंत, मानसिंग शीलवंत, काशिनाथ नागरे बाळासो शीलवंत बबन शीलवंत मिलिंद शीलवंत हरिभाऊ डोंगळे, माया शीलवंत चंद्रभागा शीलवंत भारती शीलवंत सुनील शीलवंत या मान्यवर व समाजबांधवांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मातंग समाजातील आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते,ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला तसेच पंचशील मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.






