One Nation One Election: 'एक देश, एक निवडणूक' लांबणीवर! मॉन्सून सत्रात बिल नाही (Photo Credit- X)
या विधेयकासाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचा (JPC) कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. आता जेपीसीला संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत आपला अहवाल सादर करावा लागेल. जेपीसीचा कार्यकाळ वाढवल्याने, समिती चालू अधिवेशनात आपला अहवाल सादर करणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकावरील पुढील कार्यवाही आता हिवाळी अधिवेशनात अहवाल सादर झाल्यानंतरच होऊ शकेल.
बुधवारी, समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी यांनी लोकसभेत अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वेळ मागितला होता. सभागृहाने आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर केला. संसदेचे हिवाळी अधिवेशन साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते आणि ख्रिसमसपूर्वी संपते. या मुदतवाढीमुळे आता समितीला या मोठ्या बदलावर अधिक विचारविनिमय करण्यासाठी वेळ मिळाला आहे.






