Maharashtra Breaking News
01 Nov 2025 01:50 PM (IST)
आफ्रिकन देश टांझानियामध्ये नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. पण या निवडणुकीनंतर देशभरात हिंसाचाराची आग उसळली होती. तणाव तीव्र वाढला होता, यामुळे संपूर्ण देशात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांच्यावर विरोधकांचा आरोप आहे की त्यांनी आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना अन्याय्यपणे तुरुंगात डांबले, ज्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. विरोधी पक्ष चाडेमा दावा केला आहे की, या संघर्षामध्ये ७०० लोकांचा बळी गेला आहे.
01 Nov 2025 01:45 PM (IST)
रत्नागिरी MIDC परिसरात वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी केल्याची घटना समोर आली आहे. पोलीसांना याचा सुगावा लागताच तपासा दरम्यामन पोलीसांनी व्हेल माशाच्या उलटी जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 3 कोटीपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे. विक्रीसाठी आणलेली तब्बल 3 कोटी रुपयांहून अधिक किमतीची ‘व्हेल माशाची उलटी’ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केली आहे.
01 Nov 2025 01:35 PM (IST)
पाच सामन्यांच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना काल मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (एमसीजी) येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. भारताने फक्त १२५ धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाने १४ व्या षटकात ६ गडी गमावत १२६ धावांचे लक्ष्य गाठले. जोश हेझलवूडने धोकादायक गोलंदाजी केली, ३ विकेट घेतल्या आणि त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. अभिषेक शर्माने ६८ धावांची खेळी केली. त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही.
01 Nov 2025 01:25 PM (IST)
गेलं वर्ष अॅक्शनने भरलेलं होतं, जेव्हा रोहित शेट्टीने प्रेक्षकांना आपल्या ऑल-स्टार कॉप युनिव्हर्समधील सर्वात जबरदस्त फिल्म ‘सिंघम अगेन’ दिली होती. पण सगळ्यात मोठा सरप्राईज होता. पहिल्यांदाच रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये एका महिला पोलिस ऑफिसरची एंट्री ‘लेडी सिंघम’ शक्ती शेट्टी, जी दीपिका पदुकोणने साकारली. हे पात्र दमदार आणि मस्तीखोर होतं, ज्याने पुन्हा एकदा आपल्याला रोहित शेट्टीच्या दुसऱ्या सुपरहिट चित्रपटातील ‘मीनम्मा’ची आठवण करून दिली.
01 Nov 2025 01:15 PM (IST)
लोकप्रिय मालिका “वीण दोघांतली ही तुटेना” मध्ये सध्या लग्नाचं वातावरण आहे. राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब एकत्र येऊन लग्नसोहळ्याचा आनंद घेत आहेत. आधिरा आणि स्वानंदीच्या चूडा विधीमुळे सगळीकडे सेलिब्रशनचा उत्साह आहे. मात्र, या आनंदात एक अनपेक्षित वळण येणार आहे, ज्यामुळे सर्वजण चकित होणार आहेत.
01 Nov 2025 01:05 PM (IST)
कोंढापुरी (ता. शिरुर) नजीक पुणे- नगर महार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात होऊन तब्बल सोळा प्रवासी गंभीर जखमी होऊन तीन वाहनाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी एम एच १४ सि डब्ल्यू ४१५५ या लग्झरी बस वाहनावरील चालक सचिन श्रीकिसन तायडे (वय ३२ रा. मंगळूर नवघरे ता. चिखली जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आशिष वसंतराव हिवराळे (वय ४१ रा. अचलपूर ता. अमरावती जि. अमरावती) यांनी फिर्याद दिली आहे.
01 Nov 2025 01:00 PM (IST)
मुंबईत पवईतल्या स्टूडियोमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एनकाऊंटर करण्यात आला. रोहित आर्या ने हा सगळा बनाव रचताना एक चित्रपट पाहून तशाच पद्धतीने कट आखला होता. त्याने लहान मुलांच्या अपहरणावर एक लघु पट बनवायच ठरवलं होत. त्यासाठी त्याने काही मुलांचे ऑडिशन पण घेतल्या होत्या. त्यातील १७ मुलं ही त्याने सेलेक्ट केली होती. त्याच मुलांना ओलीस ठेवून रोहित आर्या हा धमकी देत होता. अखेर त्याचा मुंबई पोलिसांनी एनकाउंटर करत द एंड केला.
01 Nov 2025 12:50 PM (IST)
पुण्याच्या दौंड तालुक्यातील राहू माधवनगर येथून एक संतापजनक आणि धक्कदायक बातमी समोर आली आहे. २७ ऊसतोड वेठबिगार कामगार व त्यांच्या कुटुंबियांना बंधनमुक्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. या वेठबिगार कामगारांची सुटका यवत पोलीस आणि तहसीलदारांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
01 Nov 2025 12:40 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका तरुणावर तलवारीसारख्या धारदार हत्याराने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या थरारक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे
01 Nov 2025 12:25 PM (IST)
यवतमाळमधून भीषण अपघाताची धक्कदायक बातमी समोर आली आहे. या अपघातात वडिलांसह तीन बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे. वडील मुलीला वणी – घुग्गुस मार्गावर कार शिकवित होते. त्यादरम्यान झालेल्या अपघातात वडिलांसह तिन्ही बहिणींचा मृत्यू झाला आहे. यात एक मुलगी गंभीर जखमी आहे.
01 Nov 2025 12:20 PM (IST)
उत्तरप्रदेशमधून बलात्काराची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. आरोपीने बलात्कार करून तिला गंभीर अवस्थेत सोडून पळ काढलं होत. CCTV फुटेजच्या आधारे 12 वर्षीय अल्पवयीनाला अटक करण्यात आली आहे.
01 Nov 2025 12:12 PM (IST)
अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबई झोनल युनिटचे ४७ कोटींचं कोकेन जप्त केलं आहे. ही कारवाई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली आहे. एका महिला प्रवाश्याकडून सुमारे 4.7 किलो कोकेन जप्त करण्यात आलं आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे 47 कोटी रुपये आहे.
01 Nov 2025 12:00 PM (IST)
आगामी महापालिका निवडणूक घेण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका सज्ज झाली असून निवडणुकीनंतर निवडून येणाऱ्या विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या दालनांच्या दुरुस्तीचा घाट पालिकेतील बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी घातला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयातील लोकप्रतिनिधींच्या कायर्यालयांसह पालिका अधिकारी व महत्वाच्या विभागाच्या कार्यालयांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागातील अभियात्यांसह पाहणी सुरू केली आहे.
01 Nov 2025 11:50 AM (IST)
मुंबईत पवईतल्या स्टूडियोमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एनकाऊंटर करण्यात आला. रोहित आर्या ने हा सगळा बनाव रचताना एक चित्रपट पाहून तशाच पद्धतीने कट आखला होता. त्याने लहान मुलांच्या अपहरणावर एक लघु पट बनवायच ठरवलं होत. त्यासाठी त्याने काही मुलांचे ऑडिशन पण घेतल्या होत्या. त्यातील १७ मुलं ही त्याने सेलेक्ट केली होती. त्याच मुलांना ओलीस ठेवून रोहित आर्या हा धमकी देत होता. अखेर त्याचा मुंबई पोलिसांनी एनकाउंटर करत द एंड केला.
01 Nov 2025 11:40 AM (IST)
आजच्या स्वकेंद्रित जगात ‘माणुसकी’ आणि ‘प्रामाणिकपणा’ हे केवळ पुस्तकातील शब्द झाले आहेत की काय? असा प्रश्न पडत असतानाच, वैजापूर येथील एसटी बसस्थानकात एका सामान्य सुरक्षा रक्षकाने आपल्या कृतीतून हे मूल्य आजही जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे. एसटी सुरक्षा रक्षक बी. आर. तडवी यांनी तब्बल साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बेवारस बॅग तिच्या मूळ मालकाला परत करून अतुलनीय प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला आहे.
01 Nov 2025 11:30 AM (IST)
बिग बॉस १९” या रिअॅलिटी शोमध्ये एक धक्कादायक अपडेट समोर आला आहे. या वेळी कोणीही बाहेर जाणार नाही असे पूर्वी वृत्त होते. आता, असा दावा केला जात आहे की एका स्पर्धकाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाहेर काढण्यात आले आहे. आठवण म्हणून, गौरव खन्ना, प्रणित मोरे, कुनिका सदानंद, फरहाना भट्ट, अमाल मलिक, शाहबाज बदेशा, तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांना यावेळी नामांकन मिळाले होते.
01 Nov 2025 11:20 AM (IST)
एलन मस्कच्या मालकीच्या स्पेसएक्सची मालकीची उपकंपनी स्टारलिंकने भारतात हायरिंग सुरु केले आहे. कंपनीने बंगळुरु ऑफीससाठी LinkedIn वर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये सांगितलं जात आहे की, भारतात लवकरच सॅटेलाईट स्टारलिंक इंटरनेट सेवा सुरु होणार आहे आणि यासाठी कंपनीने हायरिंग सुरु केलं आहे. ही कंपनी भारतात लवकरच सॅटेलाइट कम्युनिकेशन (SatCom) ऑपरेशन लाँच करण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामीण आणि खेडेगावात देखील नेटवर्क पोहोचणार आहे. स्टारलिंकला जुलै महिन्यात इंडियन रेगुलेटरद्वारे मंजूरी देण्यात आली होती. स्टारलिंक भारतातील 9 शहरांत स्टेशन सेटअप करण्याची प्लॅनिंग करत आहे.
01 Nov 2025 11:10 AM (IST)
ठाणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारकडून १३५ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यातील ६० कोटींचा निधी पहिल्या टप्प्यात पालिकेला प्राप्त झाल्यानंतरही पालिकेने अद्याप कळवा रुग्णालयातील ऑक्सिजन वाहिनी बसवण्यासाठी निविदा काढण्यासच टाळाटाळ केल्याचे निष्पन्न झाले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतली असून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
01 Nov 2025 11:00 AM (IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी घोटी टोलनाका वर पोहचले, ग्रामीण आणि शहरातील पदाधिकारी याठिकाणी एकत्रित जमून मुबईच्या मोर्चासाठी रवाना होत आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांसोबतच माकपचे पदाधिकारी देखील घोटीत जमले असून मनसेचा भगवा ध्वज आणि माकपचे लाल झेंडे एकत्रच या मोर्च्या च्या निमित्ताने एकत्रित दिसत आहेत.
01 Nov 2025 10:59 AM (IST)
एलन मस्कच्या मालकीच्या स्पेसएक्सची मालकीची उपकंपनी स्टारलिंकने भारतात हायरिंग सुरु केले आहे. कंपनीने बंगळुरु ऑफीससाठी LinkedIn वर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये सांगितलं जात आहे की, भारतात लवकरच सॅटेलाईट स्टारलिंक इंटरनेट सेवा सुरु होणार आहे आणि यासाठी कंपनीने हायरिंग सुरु केलं आहे. ही कंपनी भारतात लवकरच सॅटेलाइट कम्युनिकेशन (SatCom) ऑपरेशन लाँच करण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामीण आणि खेडेगावात देखील नेटवर्क पोहोचणार आहे. स्टारलिंकला जुलै महिन्यात इंडियन रेगुलेटरद्वारे मंजूरी देण्यात आली होती. स्टारलिंक भारतातील 9 शहरांत स्टेशन सेटअप करण्याची प्लॅनिंग करत आहे.
01 Nov 2025 10:58 AM (IST)
आज दुपारी चर्चगेट येथे मोर्चा होणार आहे. यासाठी राज ठाकरे जाणार आहे. राज ठाकरे यासाठी लोकलने प्रवास करत आहेत.
01 Nov 2025 10:55 AM (IST)
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी, जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर (PK)यांनी एक मोठे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाने बिहारच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. “जनसुराज पक्ष एकतर १० पेक्षा कमी जागा जिंकेल किंवा १५० पेक्षा जास्त जागा जिंकेल,” असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
01 Nov 2025 10:42 AM (IST)
Vivo X300 Pro आणि Vivo X300 हे दोन्ही स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हे लाँचिंग Vivo X300 सीरीज चीनमध्ये डेब्यू केल्यानंतर दोन आठवड्यांनी करण्यात आले आहे. हे दोन्ही फोन फ्लॅगशिप 3nm ऑक्टा कोर MediaTek Dimensity 9500 चिपसेटवर आधारित आहे. अलिकडच्या अहवालांनुसार, Vivo X300 सीरीज डिसेंबरच्या सुरुवातीला भारतात लाँच होऊ शकते.
01 Nov 2025 10:34 AM (IST)
मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस कारवाईदरम्यान त्याला गोळी लागली आणि गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पण त्याच्या मृत्यूनंतर रोहितचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. यात त्याची पत्नी त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे. तसेच रोहितच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर मी तुम्हाला सोडणार नाही, असंही भावनेच्या भरात बोलताना ती दिसत आहे.
01 Nov 2025 10:23 AM (IST)
यवतमाळमधून भीषण अपघाताची धक्कदायक बातमी समोर आली आहे. या अपघातात वडिलांसह तीन बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे. वडील मुलीला वणी – घुग्गुस मार्गावर कार शिकवित होते. त्यादरम्यान झालेल्या अपघातात वडिलांसह तिन्ही बहिणींचा मृत्यू झाला आहे. यात एक मुलगी गंभीर जखमी आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव रियाजुद्दीन रफिउद्दीन शेख (५२) असे आहे तर मायरा रियाजुद्दीन शेख (१७), जोया रियाजोद्दीन शेख (१२), अनिबा रियाजोद्दीन शेख (१०) असे मृत्यू झालेल्या तिन्ही मुलींचे नाव आहे.
01 Nov 2025 10:17 AM (IST)
अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये मालिका सुरु आहे. या मालिकेचे आतापर्यत दोन सामने पार पडले आहेत. या दोन्ही सामन्यामध्ये अफगाणिस्तानने विजय मिळवून मालिका जिंकली आहे. अफगाणिस्तानने झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी हरारे येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. यजमान संघाला १२५ धावांत गुंडाळल्यानंतर, अफगाणिस्तानने केवळ १८ षटकांत लक्ष्य गाठले. अफगाणिस्तानने मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली.
01 Nov 2025 09:59 AM (IST)
Donald Trump News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कोणत्या ना कोणत्या देशावर नाराज होत आहे. गेल्या काही काळात त्यांनी अनेक देशांविरोधात भूमिका घेतली आहे. भारत, रशियावर ट्रम्प नाराज आहेतच, पण आता आणखी एका देशावर त्यांना नाराजी व्यक्त केली आहे. हे ट्रम्प यांनी नायजेरियाला ख्रिश्चन धर्माच्या अस्तित्वासाठी धोक्याचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी एक मोठी निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.
01 Nov 2025 09:55 AM (IST)
मुंबई: अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबई झोनल युनिटचे ४७ कोटींचं कोकेन जप्त केलं आहे. ही कारवाई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली आहे. एका महिला प्रवाश्याकडून सुमारे 4.7 किलो कोकेन जप्त करण्यात आलं आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे 47 कोटी रुपये आहे.
01 Nov 2025 09:50 AM (IST)
Indian Man killed in Saudi : रियाध : एक मोठी बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियात (Saudi Arabia) एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस आणि गुंडांच्या चकामकी दरम्यान ही घटना घडली असल्याचे रियाधमधील भारतीय दूतावासाने सांगितले आहे. तसेच भारतीय दूतावासाने या घटनेवर शोक व्यक्त करत पीडीताच्या कुटुंबियांना सर्वोतपरी महत करण्याचे म्हटले आहे.
01 Nov 2025 09:45 AM (IST)
ऐश्वर्या राय ही बॉलिवूडची एक सुंदरी आहे, ती मोठ्या पडद्यावर दिसली किंवा नसली तरी, ती नेहमीच कल्पनारम्य जगात घराघरात प्रसिद्ध आहे. या अभिनेत्रीने १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला. त्यानंतर तिने १९९७ मध्ये मणिरत्नमच्या तमिळ चित्रपट “इरुवर” मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून या अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तथापि, तिला तिसरा हिंदी चित्रपट “हम दिल दे चुके सनम” द्वारे प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. “हम दिल दे चुके सनम” मुळे ऐश्वर्या हिंदी चित्रपटसृष्टीत रातोरात सुपरस्टार बनली. तिचा अभिनय, देखावा आणि निळे डोळे यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली.
01 Nov 2025 09:40 AM (IST)
भारतात 1 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,329 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,301 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,247 रुपये आहे. भारतात 1 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,010 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,23,290 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,470 रुपये आहे. भारतात 1 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 150.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,50,900 रुपये आहे. दिल्ली शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,160 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,23,440 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,620 रुपये आहे.
01 Nov 2025 09:35 AM (IST)
देशाचा परकीय चलन साठा घटला असून, २४ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात तो ६.९२ अब्ज डॉलर्सने कमी होऊन ६९५.३५ अब्ज डॉलर्सवर आला, अशी माहिती **रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)**ने शुक्रवारी दिली. मागील आठवड्यातच परकीय चलन साठा ४.४९ अब्ज डॉलर्सने वाढून ७०२.२८ अब्ज डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता.
01 Nov 2025 09:28 AM (IST)
राजधानीत हिवाळ्याची हलकी चाहूल लागली असून, सध्या हवामान सौम्य थंड आहे. सकाळी आणि संध्याकाळी हलके धुके जाणवत असून, लोकांना थंडीची जाणीव होऊ लागली आहे. मात्र दिवसा तापमान सामान्य असल्याने वातावरण आनंददायी आहे.हिवाळ्याच्या सुरुवातीसोबतच दिल्लीकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या दोन दिवसांत वायू प्रदूषणाच्या पातळीत सुधारणा झाली आहे. शनिवारी राजधानीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) देखील घटल्याचे निरीक्षणात आले आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, शनिवार, १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत हलके धुके पडण्याची शक्यता आहे. दिवसभर कमाल तापमान सुमारे ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान सुमारे १९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाशाचा तीव्र परिणाम होत नाही, त्यामुळे वातावरण अधिक गारठलेले जाणवत आहे.
01 Nov 2025 09:23 AM (IST)
भारतीय वंशाचे उद्योजक बंकिम ब्रह्मभट्ट यांच्यावर तब्बल ५०० मिलियन डॉलर्स (सुमारे ४००० कोटी रुपये) इतक्या प्रचंड कर्ज घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, ब्रह्मभट्ट यांनी त्यांच्या टेलिकॉम व्यवसायाशी संबंधित कंपन्यांमार्फत बनावट ग्राहक खाती आणि बनावट महसूल दाखवून अमेरिकन बँकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज उकळले. अहवालानुसार, बंकिम ब्रह्मभट्ट यांच्या कंपन्यांनी अलीकडेच दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला असून, या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. संबंधित कंपन्या प्रत्यक्षात दिवाळखोरीत आहेत की आर्थिक घोटाळा लपविण्यासाठी हा डाव रचला गेला, याचा शोध घेतला जात आहे.
01 Nov 2025 09:18 AM (IST)
भारताचा संघ महिला विश्वचषक 2025 च्या फायनलचा सामना खेळताना दिसणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेसाठी फार महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार आहे तो संघ पहिल्यांदा विश्वचषक नावावर करताना दिसणार आहे. महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून पाऊस पडत आहे विशेषत: संध्याकाळच्या वेळेला मुंबईमध्ये पाऊस कोसळत असतो. जेमिमा रॉड्रिग्जच्या शानदार आणि स्फोटक खेळीमुळे, भारतीय महिला क्रिकेट संघाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने पराभव केला.
01 Nov 2025 09:15 AM (IST)
1 नोव्हेंबर म्हणजेच आज Apple चे सीईओ टिम कुक यांचा वाढदिवस आहे. आज टिम कूक यांचा 65 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. टिम कुक हे जगातील टॉप सीईओमधील एक आहेत. टिम कूक यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. सामान्य घरात जन्म झाल्यापासून ते एका मोठ्या टेक जायंट कंपनीचा सिईओ बनेपर्यंत टिम कूक यांनी संघर्ष केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या याच संघर्षाची कथा आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सविस्तर बातमीसाठी- Happy Birthday Tim Cook: सामान्य परिवारात झाला होता जन्म, एका कॉलमुळे बदललं संपूर्ण आयुष्य! असा होता Apple सिईओचा प्रवास…
Marathi Breaking news live updates: अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबई झोनल युनिटचे ४७ कोटींचं कोकेन जप्त केलं आहे. ही कारवाई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली आहे. एका महिला प्रवाश्याकडून सुमारे 4.7 किलो कोकेन जप्त करण्यात आलं आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे 47 कोटी रुपये आहे.






