Photo Credit : Social Media
मुंबई : लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेने आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या जागांसाठी दावे प्रतिदावे करण्यास सुरूवात झाली आहे.पण हीच गोष्ट राजकीय पक्षांच्या प्रमुखांसाठी आता डोकेदुखी ठरु लागली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच म्हणजेच कल्याणमध्ये विधानसभेच्या निवडणुकी आधीच नाराजीच सूर उमटू लागला आहे. त्यामुळे या नाराजीचा शिंदेना फटका बसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ शहरातील शिवसेनेत आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर या दोन गटातील मतभेद सर्वांच्याच परिचयाचे आहेत. लोकसभा निवडणुकीतील कामगिरी, अंतर्गत गटबाजीमुळे अंबरनाथ शहरातील शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर स्वत: खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये नवीन कार्यकारणीच्या निवडीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. पण यावेळीही शहरातील दोन गट एका गट कार्यक्रमाला उपस्थित राहुल नाही. त्यामुळे शहरातील या दोन गटातील गटबाजी अजूनही कायम असल्याचे बोलले जात आहे.
अंबरनाथ शहरातील शिवसेनेत डॉ. बालाजी किणीकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यात गेल्या 10 ते 15 वर्षांपासून शीतयुद्ध सुरू आहे. पण गेल्या पाच वर्षांमध्ये किणीकर आणि वाळेकर यांच्यातील वाद टोकाला गेल् आहेत. लोकसभा निवडणुकीतही किणीकर यांच्य नेतृत्त्वाखाली संपूर्ण प्रचारयंत्रणा राबवण्यात आली . पण
गेल्या पाच वर्षांत किणीकर आणि 5 वर्षात तर या दोन गटातील शीतयुद्ध टोकाला गेलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण प्रचार यंत्रणा आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली. त्यातच कल्याणमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेच्या शहर शाखेच्या कार्यालयाऐवजी बाजूच्याच नवीन कार्यालयातून निवडणूक प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे या दोन्ही गटांची नाराजी चांगलीच वाढली होती.
त्यातच कल्याण लोकसभेत सर्वाधिक विकासकामे करूनही त्याठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नाही. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या वेळी दोन्ही गटातील मतभेद उफाळून आल्याने मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी रागाच्या भरात अंबरनाथ शहराची शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी अंबरनाथमध्ये नवीन कार्यकारणीत काम करण्यासाठी इच्छुकांच्या मुलखती घेतल्या. पण या मुलाखतींच्या कार्यक्रमालाही अरविंद वाळेकर यांच्यासह त्यांचा संपूर्ण गटाने पाठ फिरवली. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले प्रदीप पाटील हे देखील या कार्यक्रमाला गेले नाहीत. त्यामुळे असेच चालत राहिल्यास पक्षातील गटबाजी कधी कमी होणार,असा प्रश्न उपस्थित होत आहे.