तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (k chandrasekhar rao) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि शरद पवार (sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी के. चंद्रशेखर राव यांना फोन करुन मोदींविरोधातील लढ्याला पाठिंबा दिला होता. आज उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रशेखर राव हे शरद पवारांची देखील भेट घेणार आहेत. के चंद्रशेखर राव आज मुख्यमंत्री ठाकरे- पवारांच्या भेटीसाठी मुंबईत येणार आहेत.
सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेणार आहेत, असं बोललं जात आहे.