केवळ 299 रुपयांत नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईमसह अनेक ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस? तुम्हालाही आलाय असा मेसेज? सावधान, एक क्लिक अन्...
Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच, फीचर्सवर एकदा नजर टाका
टेलिग्रामवर असे अनेक चॅनेल्स उपलब्ध आहेत, जे 299 रुपयांत नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, जिओहॉटस्टार, झी5 आणि सोनी लिव्ह सारख्या ओटीटी ॲप्सचे सबस्क्रिप्शन देण्याचा दावा करतात. हे चॅनेल्स सायबर गुन्हेगारांद्वारे चालवले जातात. सायबर गुन्हेगार ग्राहकांना ओटीटी ॲप्सचे सबस्क्रिप्शन देण्याचा दावा करत वैयक्तिक माहितीची मागणी करतात. ज्यामध्ये ई-मेल अड्रेस, फोन नंबर आणि बँक डिटेल्स देखील समाविष्ट असतात. ही माहिती शेअर केल्यानंतर सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईलवर एक लिंक पाठवतात, ज्यामध्ये पेमेंट करण्यासाठी सांगितलं जातं. (फोटो सौजन्य – Pinterest)
पेमेंट करण्यासाठी जेव्हा तुम्ही लिंकवर क्लिक करता, तुमच्या अकाऊंटमधील पैसे गायब होतात. तुम्हाला कोणत्याही ओटीटी ॲप्सचे सबस्क्रिप्शन दिले जात नाही, मात्र तरी देखील अकाऊंटमधील पैसे कापले जातात. असाच प्रकार मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवर देखील सुरु आहे.
असा प्रकार पहिल्यांदा घडला नाही. यापूर्वी देखील फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अनेक ग्रुप्स आणि पेज लोकांची फसवणूक करत होते. ओटीटी ॲप्सचे सबस्क्रिप्शनच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली गेली आहे. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम किंवा जिओहॉटस्टारसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रीमियम सबस्क्रिप्शन स्वस्त दरात देण्याच्या नावाखाली लोक हॅकर्सच्या जाळ्यात सहज अडकतात.
व्हॉट्सअॅप-टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स अॅक्टिव्ह असतात. या ग्रुप्सद्वारे खोटे पण आकर्षक मेसेज लोकांपर्यंत पोहोचवले जातात. पण या मेसेजकडे दुर्लक्ष करणं शहाणपणाचं ठरतं.






