मुंबई : प्रत्येक महिन्याच एक तारखेला गॅस सिलेंडरचे (Gas cylinder) दर कमी जास्त होत असतात, त्यामुळं आज घरगुती गॅस सिलेंडरचे दर (Gas cylinder rate) कमी होतील, याकडे सामान्य जनता आस लावून बसली होती. मात्र घरगुती गॅस सिलेंडरचे दर (house Gas cylinder rate) कमी न झाल्यामुळं महिला वर्गाचे निराशा झाली आहे, तर दुसरीकडे व्यावसायिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलेंडरच्या (LPG Gas cylinder) दरांत आज घट झाली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ३६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे सध्या १९ किलोग्रॅम सिलेंडरची किंमत मुंबईत १९३६ रुपये मोजावे लागणार आहेत. (LPG gas cylinder new rate declare decreases by 36 rupees)
[read_also content=”हाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सुरु, आदित्य ठाकरेंची संजय राऊतांच्या अटकेवर प्रतिक्रिया https://www.navarashtra.com/maharashtra/aditya-thackeray-rection-after-sanjay-raut-ed-arrest-310562.html”]
दरम्यान, मागील काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. १ जूनपासून १९ किलोग्रॅमचे सिलेंडर स्वस्त झाले. जूनपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर ३७८ रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर ६ जुलै २०२२ रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये ९ रुपायंची कपात करण्यात आली होती. व १ जुलै रोजी तब्बल १९८ रुपयांनी व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाला होता. मागील तीन महिन्यात चार वेळा दरांत कपात करण्यात आली आहे. त्यामुळं व्यायसायिकांनी समाधान व्यक्त केलं आहे, मात्र दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात न झाल्यामुळं महिला वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
‘जाणून घ्या’ तुमच्या शहरातील दर