On Roots Of Fog Crops In Ambegaon Taluka Farmers Hit By Changing Climate Nrdm
आंबेगांव तालुक्यातील धुके पिकांच्या मुळावर; बदलत्या हवामानाचा शेतकऱ्यांना फटका
आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात गेले तीन ते चार दिवस पहाटेच्या वेळी सर्वत्र दाट धुके पडत आहे. त्यामुळे लागवड केलेला कांदा, कांदा रोपे इतर तरकारी पिकांना याचा फटका बसत आहे.
आंबेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात गेले तीन ते चार दिवस पहाटेच्या वेळी सर्वत्र दाट धुके पडत आहे. त्यामुळे लागवड केलेला कांदा, कांदा रोपे इतर तरकारी पिकांना याचा फटका बसत आहे. रांजणी, वळती, नागापुर, शिंगवे, पारगाव आदी परिसरात नुकतेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. पुन्हा तीन-चार दिवस दररोज पहाटे सगळीकडे दाट धुके पडत आहे. या भागातील शेतकरी कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेत आहे. त्यातुन मिळणाऱ्या पैशाचे वर्षभराचे आर्थिक नियोजन शेतकरी करत असतो. चालु हंगामात या भागातील शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामना करावा लागत आहे.
कांदा लागवडीवर विपरीत परीणाम
कांदा लागवडी एक – दोन महिन्यांच्या झाल्या आहेत. तसेच चालु लागवडीसाठी कांदारोप शिल्लक आहेत. तालुक्यात या वर्षी अवकाळी पावसाने रोपांचे नुकसान झाल्याने या वर्षी शेतकऱ्यांना कांदा रोपांचा तुटवडा भासत आहे. अशा या सर्वच कांदा लागवडी तसेच रोपे यावर सध्या दाट धुक्याचा मोठा विपरीत परिणाम होत आहे. धुक्यामुळे मावा, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर व लागवडी योग्य रोपांवर होत आहे.
आर्थिक संकटांची भिती
रोज पडणाऱ्या धुक्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. धुके पडत असल्याने कांदा पीक रोगाला बळी पडू शकते. वातावरणातील लहरीपणामुळे आंबेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना आगामी काळात आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार असल्याची भिती कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.
Web Title: On roots of fog crops in ambegaon taluka farmers hit by changing climate nrdm