राज्यात पावसाचा जोर वाढणार (फोटो- ai gemini)
राज्यात पावसाचा जोर वाढणार
विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज
प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Marathwada/Vidarbha Rain Alert: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये विदर्भ आणि मराठवाडा जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देण्यात आले आहे.
येत्या काही दिवसांमध्ये मराठवाडा, विदर्भ, परभणी, हिंगोली, अमरावती आणि अन्य जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अति ते अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाशिम, अकोला आणि अन्य जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर देखील मुसळधार पुस होऊ शकतो. मच्छीमारांनी समुद्रात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Rain Alert: पुण्याचा नाद नाही करायचा! जुलैमध्ये पावसाची विक्रमी नोंद; तब्बल 119 वर्षांनंतर….
हवामान विभागाने राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील पाणीसाठयात वाढ झाली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा वाढला आहे. अनेक धरणामध्ये पाणीसाठा वाढले आहे. कोयना धरणाचे वक्र दरवाजे उघडण्यात आले आहे.
#Monsoon2026 Update 13
३० जुलै २०२६ #SatarkAlert
डीप डिप्रेशनच्या प्रभावामुळे पुढील ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता. #Monsoon #SanshodhanUpdate pic.twitter.com/330kzqclWr — satark (@satarkindia) July 30, 2026
पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात विवि ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. विदर्भात जोरदार पाऊस होऊ शतको. हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. वीजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra Rain Alert: राज्यावर भीषण संकट! ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस; खडकवासला धरणातून…
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम राज्यावर होताना दिसत आहे. राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. राज्यात वादळी पावसाचा यंदा देखील देण्यात आला आहे.






