मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांचा आज वाढदिवस (Birthday) आहे, वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी राज्यपालांना शुभेच्छा (Wishes) दिल्या आहेत. मात्र रोहित पवारांनी दिलेल्या शुभेच्छा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महाविकास आघाडी अनेक निर्णयांवरून ठाकरे सरकार व राज्यपालांमध्ये (State government and governor) अनेकदा वाद होताना दिसले आहेत. राज्यपालनियुक्त १२ आमदार, (12 MLA) विधानसभा अध्यक्षपदाची निवड आदी विषयांवरुन राज्यपाल मविआला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असातात. त्यामुळं राज्यपाल हे भाजपाचा अजेंडा चालवत आहेत अशी टिका सुद्धा राज्यपालांवर होत असते.
घटनात्मक प्रमुख म्हणून संविधानानुसार काम करण्यासाठी आपणास ‘बारा’ हत्तीचं बळ मिळो आणि आपणांस दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 17, 2022
[read_also content=”अभिजित बिचुकले लढवणार राष्ट्रपतीपदाची निवडणूक, पाठिंब्यासाठी आमदार खासदारांच्या घेताहेत गाठी भेटी https://www.navarashtra.com/article/abhijeet-bichukale-to-contest-presidential-election-293569/”]
दरम्यान, आज राज्यपालांनी वाढदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांना खोचक टिव्ट (Tweet) करत शुभेच्छा दिल्या आहेत. “घटनात्मक प्रमुख म्हणून संविधानानुसार काम करण्यासाठी आपणास ‘बारा’ हत्तीचं बळ मिळो आणि आपणांस दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा” तसेच “छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान राष्ट्रपुरुष व महनीय व्यक्तींचा समृद्ध वारसा लाभलेल्या महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल महोदय श्री. भगतसिंग कोशारी साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!” तसेच असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळं रोहित पवारांच्या या शुभेच्छावर भाजपाकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.