मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Scam) शिवसेना नेते संजय राऊत paयांना जामीन (Bail) मिळणार की नाही? याचा आज निकाल लागणार आहे. न्यायालयाने राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी (ED) कोठडी सुनावली होती. राऊतांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, त्यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली. त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) यांची कोठडी आज संपणार आहे.
शिवसेना नेते संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत ईडीच्या अटकेत आहेत. ३१ जुलै रोजी अनेक तासांच्या चौकशीनंतर राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर न्यायालयाने राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. राऊतांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली. शनिवारी वर्षा राऊत (Varsha Raut) यांचीही जवळपास १० तास ईडीकडून चौकशी झाली.
संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली. पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केले. आठ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय, असा सवालही उपस्थित केला होता. त्यावर कोर्टाने ईडीची विनंती अमान्य करत त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर ईडीने पुन्हा १० ऑगस्टपर्यंत कोठडी वाढवून मागितली. परंतु, राऊत यांचे वकील अॅड. मनोज मोहिते यांनी ईडीच्या मागणीला विरोध केला; परंतु कोर्टाने त्यांची कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. आज त्यावर निकाल लागणार आहे.