मुंबई : सकाळी सकाळी शिवसेने संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीचं (ED) पथक दाखल झालं. या बातमीनंतर संजय राऊत यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर समर्थक जमा झाले असून या कारवाईचा निषेध करताना दिसत आहे. दरम्यान, हे सगळं सुरु असताना संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. मी तरीही शिवसेना सोडणार नाही असं म्हणत त्यांनी एक प्रकारे विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.
[read_also content=”संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/ed-team-reached-to-sanjay-raut-house-in-case-of-patra-chawl-case-neps-310024.html”]
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना काही ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेच अधिवेशन असल्याचे कारण सांगत ते ईडीच्या कारवाईला सामोरे गेले नव्हते. दरम्यान, त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली आहे. त्यानंतर आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारासअचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहचलं. संजय राऊत यांच्यासह त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार आहे. आठ अधिकाऱ्यांची टीम संजय राऊतांच्या घरी चौकशीसाठी पोहोचली आहे. आज दिवसभर ही चौकशी सुरु राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, माझ्याविरुद्ध खोटे पुरावे माझ्याविरुद्ध सादर केले जात आहे. तरीही शिवसेना लढत राहिल असं त्यांनी म्हणटलेलं आहे.