मुंबई : पदवीधर मतदार संघाच्या राजकारणावरून राज्यातील राजकारण (Politics) प्रचंड तापले आहे, कारण ठरले आहे ते नाशिकच्या राजकीय वर्तुळामुळे सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे (Satyajeet Tambe) यांच्या उमेदवारीवरून आता काँग्रेसमध्येच (Congreess) फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना काँग्रेसमधून उमेदवारी दिली जाते तर दुसरीकडे मात्र सत्यजित तांबे यांनी भाजपकडे पाठिंबा मागत आपली उमेदवारी जाहीर केली आहे. यावरुन आता सामनातून मविआला खडसावले आहे.
तांबे मंडळींची तयारी आधीपासूनचं सुरु होती, फडणवीसानीही तसे संकेत दिले होते. पण कॉंग्रेस नेतृत्वाला जाग आली नाही. आणि एका आमदारकीसाठी तांबेंनी प्रतिष्ठा घालवली. विधानपरिषद निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील गोंधळाचे चित्र समोर आलंय. असा टोला सामनाच्या आग्रलेखातून लगावला.
त्यामुळे तांबे पिता पुत्रावर आता भाजपच्या कोणत्या नेत्याचा हात आहे हे लक्षात यायला आता वेळ लागला नाही. पाठिंब्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी पाठिंबा मागणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले. त्यानंतर पदवीधर मतदारसंघाच्या राजकारणावरून आता जोरदार हालचाली सुरू झाल्या. तर दुसरीकडे नाना पटोले यांनी या पिता पुत्रांवर काँग्रेसची कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत.