रत्नागिरीत ठाकरे गटाची परिवर्तन पदयात्रा सुरू (फोटो- सोशल मीडिया)
रत्नागिरीत उबाठाची ९ दिवसांची परिवर्तन पदयात्रा सुरू
सत्ता परिवर्तन करण्याचे बाळ माने यांचे रत्नागिरीवासीयांना आवाहन
व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी
रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय तयारी आणि डावपेच सुरू झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली असताना उबाठा रत्नागिरी तर्फे उबाठाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी अंतर्गत परिवर्तनाची पदयात्रा सुरू करण्यात आली.
सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत आणि दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत ही पदयात्रा सुरू होती. नऊ दिवस ही पदयात्रा सुरू राहणार आहे आणि या पदयात्रेदरम्यान उबाठातर्फे जनतेशी संवाद साधला जाणार आहे. तसेच नगर परिषदेत सत्ता परिवर्तनासाठी जनतेचे सहकार्य, आशीवांद मागितले जात आहेत, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते, माजी आमदार बाळ माने यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
पदयात्रेतून जाणून घेणार रत्नागिरीवासीयांची मते
यावेळी माजी आमदार बाळा माने म्हणाले, सनागिरी शहरातील शंभर किलोमीटर अंतराचे जे रस्ते आहेत त्या रख्यांवरून ही उबाठाची पदयात्रा पुढील नऊ दिवस सुरू राहणार आहे. सर्व नागरिकांशी संपर्क, संवाद साधला जाणार आहे. तसेच या पदयात्रेत रत्नागिरीतील नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन बाळ माने यांनी केले. रत्नागिरीतील रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज यासारख्या महत्वाच्या विषयांवर रत्नागिरी करांची मते, या पदयात्रेत जाणून घेतली जाणार आहेत. रत्नागिरी करांच्या समस्या सोडविण्यासाठी उबावाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी काली सक्षम आहे याबाबत जागृती करून रत्नागिरी नगर परिषदेत जनतेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करावे, असे आवाहनही नागरिकांना केले जात आहे, असे माने म्हणाले.
Maharashtra Politics: कोकणात ठाकरे बंधू एकत्रित लढणार? मनसे नेत्याच्या ‘या’ विधानाने चर्चेला उधाण
कोकणात ठाकरे बंधू एकत्रित लढणार?
वरीष्ठ स्तरावर शिवसेना व मनसे यांची मने जुळली आहेत. तसेच गुहागरला एक सक्षम नेतृत्व आमदार जाधव यांच्या रुपाने मिळाले असून एकत्र काम करायला आम्हाला मजा येईल. त्यामुळे वरीष्ठांच्या निर्णयानुसार, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार जाधव यांच्याशी एकत्र बसून जागांचाबत चर्चा करणार असल्याची माहिती गुहागर तालुका मनसेचे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी वार्तालाप चर्चेत दिली. एकत्रित लढत न झाल्यास स्वबळावर आम्ही सर्व जागा लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी व मनसेची भूमिका मांडण्यासाठी गुहागर मनसेच्या श्रृंगारतळी येथे ते बोलत होते.






