संग्रहित फोटो
सुरेश राजाराम झळके (३०, रा. अमानी, ता. मालेगाव) असे मृताचे नाव आहे. सुरेश वाकळवाडी येथे सासुरवाडीला गेला होता. गुरुवारी वाकळवाडी शिवारातील सुनील चौंडकर यांच्या शेतात सुरेश झळके यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठवून पंचनामा करण्यात आला.गुरुवारी संशयित आरोपींनी सुरेशला दारू पाजली. त्यानंतर दोघांनी मिळून दोरीने त्याचा गळा आवळला. हत्येनंतर हा प्रकार आत्महत्या किंवा अपघात वाटेल, असा बनाव रचून मृतदेह शेतात टाकून दिला.
सुरेशचा मृत्यू संशयास्पद असल्याने मालेगाव पोलिसांनी त्यांची पत्नी आशा सुरेश झळके आणि तिचा प्रियकर महादेव बजरंग अंभोरे (२५, रा. पूर, ता. मंगरुळपीर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली. पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर दौघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.






