मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (Mohiy Kamboj) यांनी राष्ट्वादीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादीचा एक मोठा नेता जेलमध्ये जाणार असं त्यांनी वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादीनं प्रत्तुत्तर दिलंय. राष्ट्रवादीचे नेते, विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोहीत कंबोज यांचा खरपूस समाचार घेत मोहित कंबोज कोण आहे? हा भाजपचा भोंगा आहे. असल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही,असं म्हणटलयं.
[read_also content=”विकासकामापेक्षा केवळ राजकारणावर ‘यांचं’ लक्ष- आदित्य ठाकरे https://www.navarashtra.com/latest-news/aditya-thackeray-syas-that-they-only-focus-on-politics-rather-than-development-work-nrps-316931.html”]
भाजप नेते मोहित कंबोज यांनी काल राष्ट्रवादीचा एक मोठा नेता जेलमध्ये जाणार असल्याचं ट्विट केलं होतं. त्यांवरून आता त्यांच्यावर टिका करण्यत येत आहे. अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय. मोहित कंबोज कोण आहे? हा भाजपचा भोंगा आहे. जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का हे बोलत नाहीत? मोहित कंबोजची देखील चौकशी झाली पाहिजे. ईडी आधी कुठे धाड ताकत असेल जर त्याला माहित असेल तर मग त्याची चौकशी झाली पाहिजे. असल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही,असं मिटकरी म्हणालेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे, असं मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे दोन मोठे नेते तुरुंगात आहेत.
Save This Tweet :-
One NCP Big – Big Leader Will Meet Nawab Malik & Anil Deshmukh Soon !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 16, 2022