मुंबई : राज्याच्या राजकारणात अतिशय वेगाने घडामोडी घडताहेत. रविवारी (२ जुलै) राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. राष्ट्रवादीतून (NCP) काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. एकिकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत, तर अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटाला मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. दरम्यान, पंढरपूर दौऱ्यावर असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना शिंदे-फडणवीस सरकारवर टिका करताना राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यावर भाष्य केले.
ही सर्व महाराष्ट्राची इच्छा आहे
दरम्यान, राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला असता, हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. सध्याच्या परिस्थितीत देशात हुकुमशाही, दडपशाही, पैशाचं राजकारण सुरू आहे. ही महाराष्ट्राची ओळख पुसायची असेल, तर या प्रवृत्तीविरोधात खरोखर मनापासून प्रामाणिकपणे लढण्याची इच्छा आहे त्या सर्व घटकांनी एकत्र यावं या मताचा मी आहे. असं राऊत म्हणाले. तुमच्याप्रमाणे सर्वांचीच इच्छा आहे की, राज व उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे असं राऊत म्हणाले.
गद्दार, बोके अशी महाराष्ट्राची ओळख पुसायची आहे
महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आहे, महाराष्ट्र ही संताची भूमी आहे, महाराष्ट्र हा पांडुरंगाचा, विठ्ठलाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. किंबहुना यासर्वांमुळं महाराष्ट्राची ओळख आहे, पण मागील काही दिवसांपासून गद्दार, खोके अशी महाराष्ट्राची ओळख होत आहे. ही ओळख पुसून टाकायची आहे, असं राऊत म्हणाले. तसेच ह्या महाराष्ट्रातील जनतेला सुखाचे दिवस येवो, असं साकडे मी पांडुरंगाच्या चरणी घातले असं राऊत म्हणाले.
शिंदे गटात प्रचंड नाराजी
राज्याच्या राजकारणात अतिशय वेगाने घडामोडी घडताहेत. राष्ट्रवादीतून (NCP) काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. एकिकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. शिंदे गटात अस्वस्थता आहे. 40 लोकांना फुटलो तर संपूर्ण महाराष्ट्र आपल्या हातात येईल, तिजोरीच्या चाव्या येईल, असं वाटत होतं. पण अजित पवार यांच्या निर्णयाने त्यांची बार्गेनिंग पॉवर संपली आहे. आम्ही करू तेच ही ताकदही संपली आहे, असं राऊत म्हणाले.