मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी कामांचा धडाका सुरु केला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विशेष अधिवेशनात जवळपास ७० मिनिटे जोरदार भाषण केलं. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी आपण हा उठाव, क्रांती का केली याबद्दल सविस्तर माहिती सांगताना महाविकास (MVA) आघाडीवर घणाघाती टिका केली आहे. दरम्यान, मी अनेकदा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, पण माझं ऐकलं गेलं नाही. शिवसेना व शिवसैनिकांना (Shivsena and Shivsainik) वाचविण्यासाठी मी भाजपासोबत (BJP) सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. औरंगाबादचं (Aurangabad) नामांतर यावर उद्या कॅबिनेट बैठकीत (Cabinet meeting) शिक्कामोर्तब होईल, उद्या कायदेशीर नामांतर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 50 आमदारांवर (50 MLA) अन्याय झाला, त्यांच्या मतदारसंघातील कामं झाली नाहीत. मुख्यमंत्री शिवसेनेचा असून, नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना 4 नंबरवर पक्ष कसा गेला. असा प्रश्न सुद्धा मुख्यमंत्र्य़ांनी उपस्थित केला.
[read_also content=”ओबीसींना हक्काचे २७ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे – छगन भुजबळ https://www.navarashtra.com/maharashtra/obc-should-get-twenty-seven-reservation-of-rights-chhagan-bhujbal-304549.html”]
दरम्यान, पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, मी एकटा मुख्यमंत्री नाही तर शिवसेनेचे 50 आमदार मुख्यमंत्री आहेत. आता शिवसैनिक हक्काने माझ्यासमोर प्रश्न मांडतो आहे. शिवसेनेचं काम करताना अंगावर केसेस घेतल्या. मात्र आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणून हिणवलं जातं. तसेच शेवटीची मविआची कँबिनेट बैठक बेकायदेशीर होती असं सुद्धा शिंदे म्हणाले. सत्तेतून 50 आमदारांना बाहेर काढणं, सोपी गोष्ट नव्हती. पण आमची भूमिका जनतेनं स्विकारली. चहावाला, पानवाला रिक्षावाला म्हणून आम्हाला हिणवलं जात, याचं दु:ख होत असं सुद्धा शिंदे म्हणाले. तसेच अडीच वर्षात शिवसेना आमदारांची काम झाली नाहीत. आम्ही समुद्रात वाया जाणारं पाणी मराठवाड्याकडे वळवलं. त्याचा फायदा शेतकऱ्याना होतो. तसेच मविआत काँग्रेस व राष्ट्रवादीकडून आम्हाला डावलले गेल्याचे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी मविआ तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टिका केली.