मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांचा झालेला अपघाती मृत्यू धक्कादायक आणि अत्यंत दुःखद आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात त्यांचं मोठं योगदान होतं. मेटे यांच्या निधनाने एक संघर्षशील नेता हरपला आहे, अशी शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक व्हावे यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठीही शासनाकडे ते सातत्याने पाठपुरावा करीत होते. मराठवाड्याच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य लोक, कामगार, गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लढत राहिले. मराठवाड्यातील एका सामान्य कुटुंबातून पुढे आलेले हे नेतृत्व अकाली गेल्याने मराठा व राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मेटे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
[read_also content=”कृष्णा नदीत ९ किलोमीटर पुरातून पोहत फडकविला तिरंगा https://www.navarashtra.com/maharashtra/tricolor-was-hoisted-by-swimming-through-9-km-flood-in-krishna-river-nrdm-315947.html”]