Actress Sanjivani Patil Comeback On The Small Screen Will Be Seen In # Lai Chaas Tu Mala Serial
कलर्स मराठीवरील ‘लय आवडतेस तू मला’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. सरकार आणि सानिकाच्या प्रेमाच्या गोष्टीने प्रेक्षकांना बांधून ठेवले असतानाच त्यांच्या नुकत्याच सुरू झालेल्या सुखी संसारात लवकरच एक मोठं वळण येणार आहे. मालिकेत २० एप्रिलपासून दोन नव्या पात्रांची एंट्री होणार आहे यामुळे कथेला नवे वळण मिळणार आहे. अम्मा आणि राणीच्या येण्याने काय घडणार ? सरकार सानिकाचं आयुष्य कसं बदलणार ? नक्की कोण आहे अम्मा आणि राणी जाणून घेण्यासाठी पहा ‘लय आवडतेस तू मला’ सोम ते शनि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
‘जाट’ चित्रपटातील रणदीप हुड्डाच्या ‘त्या’ सीनवर आक्षेप; दिग्दर्शकांचं उत्तर काय?
या दोघांपैकी पहिलं पात्र म्हणजे ‘अम्मा’. ही भूमिका साकारत आहे अभिनेत्री संजीवनी पाटील. सरकार आणि सानिका आपल्या हनिमूनवर जात असताना अचानक एका अडचणीत अडकतात, जेव्हा ते कुठल्याशा सुनसान ठिकाणी मदतीच्या शोधात असतात. अशा वेळी अम्मा या रहस्यमय स्त्रीची एन्ट्री होते. अम्मा त्यांना मदत करते आणि या जोडप्याला तात्पुरता दिलासा मिळतो. मात्र, अम्माची ही मदत त्यांच्या सुखी संसारावर कुठल्या वादळाची चाहूल देणार आहे का? अम्माचं खरं उद्दिष्ट नेमकं काय आहे? तिची उपस्थिती सरकार – सानिकाच्या नात्याला कसोटीवर उभं करेल का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत रोचक ठरणार आहे.
अम्मा म्हणजेच संजीवनी पाटील म्हणाल्या, “एका कलाकाराला नेहेमी एका चौकटीच्या बाहेर जाऊन काम करायला आवडतं. आणि आता तशीच एक भूमिका माझ्या वाट्याला आली आहे, आणि त्या भूमिकेद्वारे मी पुन्हाएकदा तुमच्या समोर येते आहे. मला आनंद होतो आहे खरंच कारण तब्बल दोन अडीच वर्षांनंतर मी पुन्हा येते आहे तुमच्या भेटीला. कारण मी अश्याच भूमिकेच्या शोधत होते, आणि त्याचवेळेस मला विचारणा झाली या भूमिकेबद्दल आणि मी एका क्षणाचा सुध्दा विचार न करता होकार दिला. सरकार सानिकाचं आयुष्य आता कुठे सुखी वळणावर आलं आहे आणि तसं असताना अम्मा त्यांच्या आयुष्यात एक नाही अनेक ट्विस्ट घेऊन येणार आहे. या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना ही भूमिका नक्की आवडेल याची मला खात्री आहे. याआधी माझ्या भूमिकेला भरभरुन प्रेम मिळाले आहे तसेच यावेळेस द्याल हिच आशा आहे.”
इतकंच नाही तर, मालिकेत अजून एक गोड आणि उत्सुकता वाढवणारी एन्ट्री होणार आहे ती म्हणजे ‘राणी’! ही राणी म्हणजे एक खट्याळ, निरागस आणि चुणचुणीत मुलगी. तिच्या दोन वेण्या, रंगीबेरंगी गॉगल्स, हातात खेळण्याचं घड्याळ, स्कर्ट घातलेला मस्त स्टाईलिश लूक, धावण्याचे बूट आणि चेहऱ्यावरचं ते निरागस हास्य… यामुळे राणी प्रेक्षकांच्या मनात सहज जागा बनवेल. सानिकाच्या आयुष्यात राणीचं आगमन सुखद असणार का? की तिच्या आगमनामुळे सानिकाच्या नव्या संसारात नवा तणाव निर्माण होणार? हे पाहणं नक्कीच उत्कंठावर्धक ठरणार आहे.
प्रेक्षकांची उत्सुकता ताणणारा हा नवा ट्विस्ट आणि अम्मा-राणीची सरप्राईज एन्ट्री ‘लय आवडतेस तू मला’च्या कथेला आणखी रंगतदार बनवणार आहे.