(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेता गोविंदा काल रात्री त्याच्या घरी बेशुद्ध पडला आणि त्याला मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे त्याचे मित्र ललित बिंदल यांनी सांगितले. तसेच अभिनेत्याच्या तब्येत आता कशी आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
रुग्णालयात अभिनेत्यावर तपास सुरु
गोविंदाचे मित्र ललित बिंदल यांनी अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल पीटीआयशी बोलताना सांगितले की, “तो संध्याकाळी घरी अचानक बेशुद्ध पडला, नंतर मला फोन केला. मी त्याला क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये आणले. तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे आणि त्याची तपासणी सुरु आहेत.” ही माहिती उपलब्ध होताच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
अभिनेत्याचा मित्र ललित बिंदलने एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही बातमी शेअर केली. त्याने एक पोस्ट शेअर करत लिहिले, “माझा प्रिय मित्र गोविंदा बेशुद्ध झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झाला आहे. मी त्याच्यासाठी लवकर बरे होण्याची देवाकडे प्रार्थना करतो.” असे ते म्हणाले आहेत. आता सोशल मीडियावर चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
Colours Marathi Serial: नात्यांची कसोटी, इंद्रायणीची जिद्द; लग्नाआधीच श्रीकलाचं सत्य उघड करणार?
चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया
ही बातमी येताच नेटिझन्सनी चिंता व्यक्त केली आहे. एका वापरकर्त्याने म्हटले, “अरे देवा, गोविंदाचे काय झाले?” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “अरे देवा, हे काय चालले आहे?” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “बॉलीवूडचे काय झाले आहे?” इतर वापरकर्त्यांनीही अभिनेत्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता गोविंदा बरे होऊन घरी कधी परततील याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.






