(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कृष्ण रुपात दिसणारी संस्कृती आणि सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या तिच्या या लूकच सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे. आणि हा खास लूक आणि तिच्या मनाच्या अगदी जवळच्या असलेला हा प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी संस्कृतीने सोशल मीडियावर तिच्या या नव्या लूक आणि प्रोजेक्ट बद्दल सांगितल होत. “संभवामी युगे युगे” हा तिचा पहिला वहिला डान्स ड्रामा लवकरच प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार असून साता समुद्रापार दुबई मध्ये याचा पहिला शो येत्या २० डिसेंबर २०२५ रोजी पार पडणार आहे.
रश्मिका मंदान्ना राजस्थानमध्ये विजय देवरकोंडासोबत करणार लग्न? अभिनेत्रीने स्वतःच सांगितले सत्य
जगाच्याबाहेर जाऊन हा शो परफॉर्म करण्यासाठी संस्कृती सज्ज होताना दिसते आहे या प्रोजेक्ट मागची तिची मेहनत तिच्या BTS मधून अनुभवयाला मिळत असून हा शो भारतात देखील लवकरच होणार असल्याचे समजले आहे.
या बद्दल बोलताना संस्कृती म्हणाली, ‘ “संभवामी युगे युगे” या डान्स ड्रामाचा शुभारंभ आम्ही दुबई मध्ये करतोय खूप उत्सुकता आहे तेवढी धाकधूक देखील होत आहे कारण परदेशात जाऊन हा पहिला शो करणं हे आमच्यासाठी खूप खास आहे दुबई मधला प्रेक्षकवर्ग पहिल्यांदा हा सगळा सोहळा अनुभवणार आहे. “संभवामी युगे युगे” ची एक सुंदर छान सुरुवात व्हावी आणि ती सुद्धा दुबई मध्ये हे आमचं आधी पासून ठरलं होत. दुबई नंतर भारतात आपल्या महाराष्ट्रात याचे शो करण्यासाठी देखील मी तितकीच उत्सुक आहे.’
लीजेंडरी प्रोड्यूसर AVM Saravanan यांचे निधन; रजनीकांतच्या ‘शिवाजी द बॉस’ चित्रपटाचे होते निर्माते
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘कृष्णाला भाषा नसते अस म्हणतात आणि म्हणून परदेशात जाऊन तिथल्या प्रेक्षकांना काहीतरी वेगळा अनुभव देण्याचा विचार असल्याने आम्ही हा पहिला शो परदेशात करण्याचं ठरवलं आहे. “संभवामी युगे युगे” लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येण्यासाठी आम्ही सगळेच सज्ज आहोत.” असे अभिनेत्री म्हणाली आहे.
दिग्गज कलाकार सुमित राघवन यांनी संस्कृती साकारणार असलेल्या कृष्णाच्या भूमिकेसाठी आवाज दिला आहे. या प्रोजेक्ट मध्ये वैविध्यपूर्ण गोष्टीचा मिलाप बघायला मिळणार आहे. कृष्णाच्या रूपाची लिलया आणि किमया लवकरच दुबई मधल्या प्रेक्षकांना मोहित करणार यात शंका नाही. तसेच यानंतरचे शो प्रेक्षकांना कुठे पाहायला मिळेल हे देखील लवकरच समजणार आहे.






