(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
तमिळ उद्योग शोकात बुडाला आहे. प्रसिद्ध निर्माते एव्हीएम सरवनन यांचे गुरुवारी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. सरवनन बऱ्याच काळापासून आजारी होते आणि वयाशी संबंधित आजारांनी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर उद्योगविश्वात शोक व्यक्त करत आहे, सोशल मीडियावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे, ज्यात रजनीकांत यांचा ‘शिवाजी द बॉस’ या चित्रपटाचा देखील समावेश आहे.
‘वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न…’ मलायका अरोराने Ex पती अरबाज खानचे नाव न घेता साधला निशाणा!
आज होणार अंत्यसंस्कार
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एव्हीएम सरवनन यांचे अंत्यसंस्कार आज होणार आहेत. त्यांचे पार्थिव आज दुपारी ३:३० वाजेपर्यंत चेन्नईतील एव्हीएम स्टुडिओमध्ये ठेवण्यात येणार आहे. जिथे कुटुंब, मित्र, चाहते आणि चित्रपट उद्योगातील सदस्य अंतिम दर्शन घेऊ शकतील. त्यानंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
एव्हीएम सरवनन यांनी उत्कृष्ट चित्रपटांची केली निर्मिती
एव्हीएम सरवनन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामध्ये “नानुम ओरू पेन,” “संसारम अधू मिन्सारम,” “मिनसारा कनावू,” “वेत्तैकरण,” आणि “शिवाजी: द बॉस” यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसने जवळजवळ पाच दशकांपासून चित्रपटांची निर्मिती केली आहे. शेवटचा फीचर फिल्म २०१० मध्ये तयार करण्यात आला होता. आता, त्यांचा स्टुडिओ ओटीटी प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे आणि जाहिरातींवर काम करतो.
रश्मिका मंदान्ना राजस्थानमध्ये विजय देवरकोंडासोबत करणार लग्न? अभिनेत्रीने स्वतःच सांगितले सत्य
अनेक पुरस्कारांनी करण्यात आले सन्मानित
एव्हीएम सरवनन यांचे पूर्ण नाव सरवनन सूर्य मणी आहे. ते एव्हीएम सरवनन म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वडिलांनी १९४५ मध्ये सुरू केलेल्या तमिळ उद्योगातील एव्हीएम प्रॉडक्शन्स या प्रमुख प्रॉडक्शन हाऊसचे ते मालक आहेत. त्यांनी निर्माता म्हणून दोन फिल्मफेअर पुरस्कार देखील जिंकले आहेत. तसेच आता त्यांच्या अचानक जाण्याने चाहते नाराज झाले आहेत.






