DDLJ ला ३० वर्षे पूर्ण! लंडनमध्ये राज-सिमरनच्या कांस्य प्रतिमेचे अनावरण (Photo Credit- X)
शाहरुख खानला आजही आश्चर्य
आपल्या चित्रपटाच्या विक्रमी यशावर बोलताना अभिनेता शाहरुख खान म्हणाला की, चित्रपट इतका सुपरहिट होईल, असे त्यांना अजिबात वाटले नव्हते.
“अशा सिनेमाचा भाग होण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. खरं सांगायचं तर, ‘DDLJ’ लोकांच्या हृदयात इतकी मोठी जागा मिळवेल, असा विचार आमच्यापैकी कोणीही केला नव्हता. आदि (आदित्य चोप्रा) आणि इतरांना वाटले असेल की हा एक चांगला चित्रपट आहे आणि लोकांना तो आवडेल, पण मला वाटत नाही की कोणी विचार केला असेल की चित्रपट सर्व रेकॉर्ड तोडेल.”
ब्रिटनला श्रेय
शाहरुख खान पुढे म्हणाला की, काजोल आणि माझ्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय चित्रपट उद्योगासाठीही हा पुतळा महत्त्वाचा आहे.
“युके, लंडन एका अर्थाने आमच्या स्टारडमसाठी मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. कारण आम्ही आमच्या देशात इतर अभिनेत्यांसारखे चांगले काम करत होतो, पण मला वाटते की आम्ही परदेशातील, विशेषतः युकेसारख्या बाजारपेठांमध्ये खूप चांगले काम करायला सुरुवात केली आणि त्यावर आपला ठसा उमटवला.”
शूटिंगच्या आठवणी
चित्रपटाच्या निर्मितीबद्दल बोलताना शाहरुख खानने सांगितले की, चित्रपटाची सुरुवात ६ तरुणांपासून झाली होती. त्यावेळी आदित्य चोप्रा आणि करण जोहर सहायक दिग्दर्शक होते.
“३० ते ४० दिवसांचा प्रवास खूप मजेशीर होता आणि आम्ही स्वित्झर्लंड आणि इंग्लंडमध्ये चित्रपटाचे शूटिंग वेगाने पूर्ण केले. लीसेस्टर स्क्वेअरमध्येही आम्ही शूटिंग केले होते आणि गुपचूप निघून गेलो होतो. पण आता, भारतीय चित्रपटांना जगभर ओळख देणाऱ्या ब्रिटनमध्ये या चित्रपटाला इतका सन्मान मिळणे ही गर्व करण्यासारखी गोष्ट आहे.”
गौरव मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट
‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट लीसेस्टर स्क्वेअरवर प्रतिमा (स्टॅच्यू) लावून सन्मानित होणारा पहिली भारतीय फिल्म आहे. यापूर्वी ‘हॅरी पॉटर’, ‘मेरी पॉपीन्स’, ‘पॅडिंग्टन’, आणि ‘सिंगिंग इन द रेन’ यांसारख्या ऐतिहासिक हॉलिवूड चित्रपटांना या ठिकाणी स्थान मिळाले आहे.
हे देखील वाचा: Sudan Kidnapping: सुदानमध्ये ओडिशाच्या आदर्शचे अपहरण; शाहरुख खानशी आहे कनेक्शन?






