(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पादुकोण काही दिवसांपूर्वी तिच्या ‘८ तासांच्या शूटिंग शिफ्ट’च्या मागणीमुळे चर्चेत होती. तिच्या या निर्णयाला काहींचा पाठिंबा मिळाला, तर काहींनी टीकाही केली. इतकंच नव्हे तर या मागणीमुळे तिला दोन मोठ्या चित्रपटांमधून देखील वगळण्यात आलं होतं. मात्र आता दीपिका आणि तिचा नवरा रणवीर सिंग एका नव्या लुकमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.
दीपिका आणि रणवीरने त्यांच्या इंस्टाग्रामवर एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते अबू धाबीतील विविध सुंदर ठिकाणाने फिरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये दोघंही शेख झायेद ग्रँड मशीदमध्येही दिसतात. या व्हिडिओमध्ये दीपिका आणि हिजाबमध्ये दिसते, तर रणवीरने वाढवलेली दाढी आणि साधा लूक दिसत आहे. या दोघांचे लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लूकचे चाहत्यांनी कौतुक देखील केलं आहे. या दोघांचा पारंपरिक अंदाज पाहून चाहते अक्षरश: फिदा झाले आहेत. दीपिकाचा हिजाबमधील लूक आणि रणवीरचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.या व्हिडिओला दोघांनी “माझं सुख” असं कॅप्शन दिलं आहे. ‘सिंघम अगेन’नंतर रणवीर आणि दीपिका यांचा हा पहिला एकत्रित प्रोजेक्ट आहे.
या जाहिरातीत रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण अबू धाबीच्या संस्कृतीचा अनुभव घेताना दिसत असून ते प्रेक्षकांना देखील माहिती देत आहेत. व्हिडिओची सुरुवात एका संग्रहालयात ठेवलेल्या जुनी कलाकृती पाहताना केली आहे. रणवीर त्या मूर्तीचे कौतुक करत म्हणतो, तुम्हाला वाटतं का की, त्या काळात इतक्या बारकाईचे काम होऊ शकत होते? कधी कधी मला वाटतं, जर माझी मूर्ती तयार झाली, तर मी कोणता पोझ करेन?”त्यावर दीपिका हसत म्हणते,”तुम्ही खरोखर एखाद्या म्युझियममध्ये ठेवण्याजोगे आहात!”
I think he might be in love with her ❤️🩹
#RanveerSingh #deepveer #DeepikaPadukone pic.twitter.com/SQKV8qFFIy — khanna (@cozybambii) October 6, 2025
दीपिका आणि रणवीरच्या या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले आहे, “हिजाबमध्ये ती कमालीची सुंदर दिसते.” तर दुसऱ्याने लिहिलं, “या सुंदर हिजाबमुळे दीपिकाला एक ग्लॅमरस लुक मिळालाय.” अश्या अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या असून त्यांचे भरभरून कौतुक देखील केलं आहे.
MoAther in Hijab..oh gorgeousness Padukone #DeepikaPadukone ✨❤️ pic.twitter.com/BET9WaQC3A — Vishalll (@vishalvarun251) October 6, 2025