(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित आज तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे चर्चेत असते. तिच्या नृत्य व्हिडिओंपासून ते कौटुंबिक क्षणांपर्यंत, माधुरीच्या प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांचं लक्ष असतं.
आज, माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. नेने यांच्या लग्नाला २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास दिवशी माधुरीने डॉ नेने यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांच्या दोघांचे सुंदर असे फोटो पाहायला मिळत आहेत.ते विविध ठिकाणी फिरायला गेलेले असताना काढलेले काही फोटो पाहायला मिळत आहेत.श्रीराम नेने आणि माधुरी यांच्या आयुष्यातील काही खास क्षण या फोटोमध्ये दिसत आहेत. यामध्ये सुंदर‘तू हैं तो’ हे गाणे ऐकायला मिळत आहे.
ओरिजिनल संगीत, नवे कलाकार आणि मोठ्या स्वप्नांना मिळणार प्लॅटफॉर्म, ‘I-POPSTAR’ मनोरंजनासाठी सज्ज
हे फोटो शेअर करताना माधुरी दीक्षितने लिहिले, “क्षणांपासून ते आठवणींपर्यंत, गेली २६ वर्षे एकत्र आयुष्य जगत आहोत. हॅपी अॅनिव्हर्सरी”, असे लिहित तिने तिचे पती डॉक्टर नेनेंना टॅग केले. माधुरीने काही खास फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचे दिसत आहे.
दीक्षित हिने १९८४ साली ‘अबोध’ या हिंदी चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. मात्र, पदार्पणातील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि माधुरीच्या करिअरची सुरुवात काहीशी संघर्षमय ठरली.या अपयशानंतर काही वर्षे तिला महत्त्वाच्या संधी मिळाल्या नाहीत, आणि नाव कमवण्यासाठी ती सातत्याने प्रयत्न करत राहिली.
अक्षय कुमारच्या डीपफेक व्हिडिओवर उच्च न्यायालयाने दिले आदेश, म्हटले ‘समाजासाठी गंभीर बाब …’
परंतु १९८८ साली आलेल्या ‘तेजाब’ या चित्रपटाने तिच्या करिअरला खऱ्या अर्थाने नवी दिशा दिली. या चित्रपटातील ‘एक दो तीन’ हे गाणं अफाट गाजलं आणि माधुरी घटकेत प्रेक्षकांच्या मनात घर करू लागली. या गाण्याने तिला सुपरस्टारच्या श्रेणीत नेऊन बसवलं.
‘तेजाब’नंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही. दिल, साजन, बेटा, हम आपके हैं कौन, दिल तो पागल है यांसारख्या हिट चित्रपटांमधून तिने अभिनयाच्या आणि नृत्याच्या जोरावर आपली अद्वितीय छाप पाडली.