(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
आज प्रियांका चोप्राने केवळ देशातच नाही तर जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. आज बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळख करून देण्याची गरज नाही. ती केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही एक प्रसिद्ध स्टार बनली आहे. , प्रियांका चोप्रासाठी हा मार्ग सोपा नव्हता. यश मिळवण्यासाठी तिला अनेक त्याग करावे लागले.
प्रियांका चोप्रा जवळजवळ सात वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतत आहे. अभिनेत्री शेवटची ‘द स्काय इज पिंक’ मध्ये दिसली होती, ज्यामध्ये फरहान अख्तर आणि रोहित शराफ यांच्यासोबत काम केले होते. जवळजवळ सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, प्रियांका एसएस राजामौली यांच्या ‘वाराणसी’ या चित्रपटातून पडद्यावर परतणार आहे.
प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा तिच्या “वाराणसी” चित्रपटाने बॉलिवूडमध्ये चर्चेत आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटात ती महेश बाबूसोबत दिसणार आहे. पृथ्वीराज सुकुमारन देखील या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
अलिकडेच प्रियंका चोप्राने तिच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. प्रियंकाने 20 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती. ती म्हणते की चित्रपटांमधील तिचा प्रवास सोपा नव्हता. आज तिला मिळणारे स्टारडम आणि यश हे खूप मेहनत आणि त्यागाचे परिणाम आहे.
प्रियांका चोप्रा म्हणते की जेव्हा ती २० वर्षांची होती आणि चित्रपटसृष्टीत नुकतीच सुरुवात करत होती, तेव्हा ती सर्व प्रकारच्या चित्रपटांसाठी खुली होती. ती म्हणते की तिच्याकडे नाही म्हणण्याचा पर्याय नव्हता.
पुढे अभिनेत्री म्हणाली, ”मी जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरूवात केली तेव्हा मिळेल ते काम केले. मी असं करायचे कारण, मला वाटयचे कि आपल्याला काम तरी मिळतेय हेच खूप आहे. 20 व्या वर्षी मी कामाच्या बाबतीत खूप स्वार्थी होते. मला कामाची भूक होती.”
त्यानंतर ती म्हणाली, ” या सगळ्यात मी बऱ्याच गोष्टीचा त्याग केला आहे. मी खूप मेहनत केली. अनेक वाढदिवस चुकवले आहेत. माझे वडील रूग्णालयात असताना मी त्यांच्यासोबतही राहू शकले नाही. बऱ्याचदा दिवाळी सुद्धा साजरी केली नाही. माझे एक कुटुंब आहे हे मी विसरले होते. त्यांच्यासोबत मला वेळ घालवता आला नाही. त्यावेळी खूप कष्ट, मेहनत केली. ” असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.






