(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध पंजाबी विनोदी अभिनेता जसविंदर भल्ला यांचे निधन झाल्याने आहे. या दुःखद बातमीने संपूर्ण पंजाबी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झालेले जसविंदर भल्ला यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये अनेक हिट आणि मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. उद्या शनिवारी त्यांचे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. तसेच आता चाहते आणि अनेक मोठमोठे कलाकार त्यांचा श्रद्धांजली वाहत आहेत. जसविंदर भल्ला त्यांच्या कारकिर्दीत कोणत्या चित्रपटांचा समावेश आहे जाणून घेऊयात.
Vishwambhara Teaser: चिरंजीवीने पूर्ण केले वचन; वाढदिवसापूर्वीच चाहत्यांना दिले ‘हे’ खास गिफ्ट!
पंजाब कृषी विद्यापीठात प्राध्यापक होते
जसविंदर भल्ला यांचा जन्म ४ मे १९६० रोजी लुधियाना येथे झाला. त्यांचे वडील प्राथमिक शाळेतील शिक्षक होते. जसविंदर भल्ला हे सुशिक्षित होते. पंजाब कृषी विद्यापीठातून बीएससी आणि एमएससी केल्यानंतर त्यांनी चौधरी चरण सिंग पदव्युत्तर महाविद्यालय, मेरठ येथून पीएचडी पदवी देखील मिळवली. जसविंदर भल्ला यांनी पंजाब कृषी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक, नंतर प्राध्यापक आणि नंतर विभागप्रमुख म्हणून काम केले. २०२० मध्ये ते नोकरीतून निवृत्त झाले.
‘छनकटा’ या विनोदी मालिकेने कारकिर्दीला सुरुवात
जसविंदर भल्ला यांनी १९८८ मध्ये ‘छनकटा’ या ऑडिओ कॅसेटने विनोदी कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर या मालिकेच्या २७ हून अधिक ऑडिओ आणि व्हिडिओ कॅसेट प्रदर्शित झाल्या. त्यानंतर त्यांनी १९९८ मध्ये ‘दुल्ला भाटी’ या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. १९९९ मध्ये ते ‘महौल ठीक है’ मध्ये इन्स्पेक्टर जसविंदर भल्लाच्या भूमिकेत दिसले आणि येथून त्यांना ओळख मिळाली. प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले.
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक; पोलिसांशी झालेल्या झटापटीत जखमी
अनेक सुपरहिट पंजाबी चित्रपटांचा समावेश
भल्ला यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये ‘जिने मेरा दिल लुटिया’, ‘जट्ट अँड ज्युलिएट’, ‘कॅरी ऑन जट्टा’, ‘सरदारजी’, ‘पॉवर कट’, ‘मुंडे कमल दे’, ‘किट्टी पार्टी’ आणि ‘कॅरी ऑन जट्टा ३’ यासारखे सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. दिलजीत दोसांझसारख्या बड्या स्टार्ससोबतही त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. जसविंदर भल्ला यांनी आता जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांची संपूर्ण कारकीर्द प्रेक्षकांच्या मनात राहणार आहे.