(फोटो सौजन्य - x अकाउंट)
२०१६ चा रोमँटिक चित्रपट ‘सनम तेरी कसम’ जवळजवळ नऊ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांना थिएटरमध्ये आकर्षित करण्यात यशस्वी झाला. पण हा चित्रपट पुन्हा एकदा ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात तो यशस्वी झाला आहे. ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटात हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा हुसेन मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधिका राव आणि विनय सप्रू यांनी केले आहे.
व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित होणार मराठी पहिलंच रोमँटिक इंस्ट्रुमेंटल गाणं…
सनम तेरी कसमचे बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट पहिल्यांदा ५ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट नऊ वर्षांनी पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. त्यावेळी हा चित्रपट २५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे ५६ कोटी रुपये कमावले होते. चित्रपटाची कथाही राधिका राव आणि विनय सप्रू यांची होती.
‘सनम तेरी कसम’ बॉक्स ऑफिस कलेक्शन
कमाल आर खान यांनी ‘सनम तेरी कसम’च्या रिलीज झालेल्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल ट्विट केले आहे आणि चित्रपटाच्या कलेक्शनची माहिती दिली आहे. केआरकेने इंस्टाग्रामवर लिहिले, ‘सनम तेरी कसम चित्रपटाचे पहिल्या दिवशी ऑल इंडिया नेट कलेक्शन. चार कोटी रुपये. पुन्हा प्रदर्शित झालेल्या आणि YouTube वर देखील उपलब्ध असलेल्या चित्रपटासाठी हा मोठा व्यवसाय आहे.’ असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
‘सनम तेरी कसम’ हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात लोकप्रिय अशी लव्हस्टोरी असणाऱ्या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात कायम घर केलं. सिनेमातील गाणीही आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. निर्माते आणि दिग्दर्शकांनी ८ वर्षांनी चाहत्यांना चित्रपटाच्या सीक्वेलची गुडन्यूज दिली. यामध्ये हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. बाकी स्टारकास्टबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोहम रॉकस्टार एंटरटेन्मेंटच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘सनम तेरी कसम २’ बाबत पोस्ट करण्यात आली होती. चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा सप्टेंबर २०२४ मध्ये करण्यात आली होती.