(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे, जो बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. सोमवारी, अभिनेत्याने आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईतील बाबुलनाथ मंदिराला भेट दिली. आता त्याचेच व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. त्यांच्या मंदिर भेटीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आणि चाहत्यांचा त्याला प्रतिसाद मिळत आहे.
Chhaava Movie: ‘हमारी सबसे बडी कमाई…’, थिएटरमधील छोट्या मुलाने दिलेली गर्जना ऐकून विकी भावुक
मंदिरातील विकीचा लूक व्हायरल
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा ऐतिहासिक नाट्यमय चित्रपट २०२५ मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा हिंदी ओपनर बनला आहे आणि विकीचा एकल अभिनेता म्हणून आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. ‘छावा’ने आता १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात प्रार्थना करताना विकी कौशलने आपला देसी अवतार दाखवला आणि पांढऱ्या पायजम्यासह बेज रंगाचा कुर्ता, कोल्हापुरी चप्पल आणि गडद रंगाचे सनग्लासेस घातले आहे.
चाहत्यांना अभिवादन केले
कडक पोलिस बंदोबस्तात मंदिरात जाताना, त्याने आपल्या चाहत्यांचे स्मितहास्य करून आणि हात जोडून स्वागत केले. वाटेत त्याने काही चाहत्यांसोबत फोटोही काढले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, विकी मंदिरात प्रार्थना करताना दिसत आहे. विकी, रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना आणि इतर अभिनीत ‘छावा’ने पहिल्या दिवशी ३३ कोटी रुपये कमावले आणि २०२५ मधील सर्वात मोठा हिंदी ओपनर चित्रपट ठरला आहे.
चित्रपटाची एकूण कमाई
विकीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग आहे. धमाकेदार सुरुवातीनंतर, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात मोठी उडी घेतली आणि केवळ रविवारीच ५० कोटी रुपयांची कमाई केली. या ऐतिहासिक अॅक्शन चित्रपटाने पहिल्या रविवारी ४९.६३ कोटी रुपये कमावले, ज्यामुळे पहिल्या तीन दिवसांत त्याचा एकूण गल्ला ११७.६३ कोटी रुपये झाला आहे. चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.