एक निर्णय बदलणार इंदू, गोपाळ आणि अधू चे संपूर्ण आयुष्य?
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका इंद्रायणीमध्ये महत्त्वाच्या घटना सुरु आहेत. मालिकेमध्ये अधू, इंद्रायणी आणि गोपाळ यांचे नाते एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचले आहे. गोपाळ आणि इंदूमध्ये स्वप्नांवरून टोकाचा संघर्ष उभा राहतो, तर दुसरीकडे, आनंदीबाईंनी अधोक्षजचं लग्न प्रमिलाशी ठरवून एकतर्फी निर्णय घेतला आहे.
एकीकडे इंदूने विठूच्या वाडीत शाळा उभारण्याचं स्वप्न उराशी बाळगलं; आणि गोपाळला मुंबईत करिअर करायचं आहे. आता इंदू या द्विधा मनस्थितीत अडकली आहे इंदू नक्की काय निर्णय घेणार ? अधूचे इंदूवर प्रेम आहे म्हणून तो आईच्या आनंदासाठी प्रमिलाशी लग्न करायला तयार होईल का ? की इंदू कडे आपल्या भावना व्यक्त करेल ? जाणून घेण्यासाठी बघा इंद्रायणी सोम ते शनि संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
गोपाळ आणि इंदू यांच्यात भविष्याबाबत मोठा वाद होताना दिसणार आहे. शिक्षण खात्याने गावात शाळा उभारण्यासाठी जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे. इंदूने त्या जमिनीवर श्रमदानातून शाळा उभारण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे. इंदूने मात्र गावात थांबण्याचा निर्णय घेतला आहे. तिचं म्हणणं आहे की शिक्षण ही खरी प्रगतीची वाट असून, तिने दिलेलं वचन पूर्ण करणं हे तिचं कर्तव्य आहे. पण गोपाळचे स्वप्न काही वेगळेच आहे आणि म्हणूनच गोपाळ इंदूच्या मतभेदातून नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर असताना इंदू आपल्या प्रेमापोटी स्वप्नांचं त्याग करेल की सुवर्णमध्ये शोधेल? की विठू रायाची मदत घेऊन हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न करेल?
Kaun Banega Crorepati मध्ये अमिताभ बच्चनची जागा घेणार सलमान खान? नवीन होस्टबाबत समोर आले अपडेट
दरम्यान, दुसऱ्या बाजूला आनंदीबाईंचा हट्ट कायम आहे. आनंदीबाईंनी ८ तारखेचा शुभमुहूर्त ठरवून अधोक्षजचं प्रमिलाशी लग्न जाहीर केलं आहे. हा एकतर्फी निर्णय आहे असे म्हणायला हरकत नाही. अधोक्षजचं मन मात्र इंद्रायणीमध्ये गुंतलेलं आहे परंतू तो आईच्या विरोधात बोलू शकेल का? इंदू आपल्या मनातलं सत्य सांगू शकेल का?
संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरिट’मधून दीपिका बाहेर? ‘या’ कारणामुळे अभिनेत्री चित्रपटातून बाहेर
एका बाजूला इंदूच्या स्वप्नांपुढे उभा ठाकलेला गोपाळ आणि दुसरीकडे अधोक्षजवर होत असलेला आनंदीबाईंचा दबाव हे दोन्ही संघर्ष मालिकेला नवं नाट्यमय वळण देणार आहेत. पुढील भागांत या पात्रांची निर्णयप्रक्रिया काय वळण घेते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. जाणून घेण्यासाठी बघा इंद्रायणी सोम ते शनि संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.