रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची गेल्या वर्षी म्हणजेच १९ फेब्रुवारी २०२४ ला घोषणा करण्यात आली होती. सध्या चित्रपटाची शुटिंग सुरु आहे. मंगळवारी (२२ एप्रिल) चित्रपटाच्या शुटिंगनंतर एक डान्सर अंघोळीसाठी नदीमध्ये गेला होता. पण अंघोळीसाठी गेलेला डान्सर नदीत बुडाला होता. आता अखेर दोन दिवसांनंतर त्या बेपत्ता असलेल्या डान्सरचा मृतदेह सापडला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर Hania Aamir ‘भारतीय मिसाईल हल्ल्या’मुळे चिंतेत, पाकिस्तानला दिला खास संदेश!
“मंगळवारी (२२ एप्रिल) रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या शुटिंगनंतर कोरिओग्राफी टीममधील २६ वर्षीय डान्सर अंघोळीसाठी नदीमध्ये गेला होता. पण अंघोळीसाठी गेलेला तो डान्सर नदीत बुडाला होता. त्याचा मृत्यू कृष्णा नदीत बुडून झालेला आहे.”, अशी माहिती सांगली पोलिसांनी माध्यमांना मृतदेह सापडल्यानंतर दिली. पोलिस आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीमध्ये बुडालेल्या डान्सरचं नाव सौरभ शर्मा असं आहे. त्याचा मृतदेह कृष्णा नदीमध्ये गुरुवारी (२५ एप्रिल) सकाळी सापडला. गेल्या दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. आता अखेर तो सापडला आहे. सध्या पोलिस पुढची कार्यवाही करीत आहेत.
२ ब्लॉकबस्टर मुव्हीला दिला होता कंगनाने नकार, बॉलिवूडचा भाईजान भडकून म्हणाला, ‘मी तुला…’
कशी घडली घटना ?
सातारा जिल्ह्यातील संगम माहुली गावात ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होती. मंगळवारी संध्याकाळी चित्रपटातल्या गाण्याचं शूटिंग आटोपल्यानंतर सौरभ कृष्णा नदीत हात धुण्यासाठी गेला होता. हात धुऊन झाल्यानंतर तो नदीमध्ये पोहण्यासाठी गेला. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्याला तो समजून आला नाही. त्यामुळे तो वाहून गेला. सौरभ बेपत्ता झाल्याचं समजताच अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख, निर्माती जिनिलीया देशमुख आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा हे संपूर्ण टीमसह तात्काळ नदीकाठी पोहोचले. त्यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला सौरभ बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि शोध मोहीम सुरू केली.
“मी मुस्लीम असून सर्व हिंदूंची …”; प्रसिद्ध काश्मीरी बॉलिवूड अभिनेत्रीचा फुटला बांध
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२२ एप्रिल) संध्याकाळी सौरभ शर्मा नदीमध्ये बेपत्ता झाला. तो बेपत्ता झाल्यानंतर लगेचच पोलिस, जिल्हा प्रशासन आणि बचाव पथकांनी त्याची शोधमोहिम सुरु केली. मंगळवारी रात्री अंधार झाल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली. बुधवारी पुन्हा सौरभला शोधण्यात आलं. दिवसभर शोधूनही तो सापडला नाही. त्यानंतर गुरुवारी सकाळी साडेसात वाजता पोलीस आणि बचाव पथकाला सौरभचा मृतदेह नदीतून सापडला. याप्रकरणी सातारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.