(फोटो सौजन्य - x अकाउंट)
ऑस्कर विजेता स्टार जीन हॅकमन आणि त्यांची पत्नी बेट्सी अराकावा हे त्यांच्या राहत्या घरात रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळले आहेत. यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. जीन हॅकमन आणि त्यांच्या पत्नीचे तसेच त्यांच्या कुत्र्याचे मृतदेह सापडले आहेत. सांता फेच्या एका शेरीफने ही माहिती शेअर केली आहे.
द गार्डियनच्या वृत्तानुसार, ९५ वर्षीय जीन हॅकमन आणि त्यांची ६३ वर्षीय शास्त्रीय पियानोवादक पत्नी बेट्सी अराकावा हे बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले आहेत. ही माहिती सांता फेने पोलिसांना कळवली आहे. दरम्यान, प्रेस असोसिएशनने सांगितले की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आणि पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत.
O Saathi Re: इम्तियाज अलीच्या नव्या रोमँटिक सिरीजची घोषणा, अदिती रावसह चमकणार हे कलाकार!
जीन हॅकमन आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू कधी आणि कसा झाला? तपास सुरू
शेरीफ मेंडोझा म्हणाले की, या प्रकरणात अद्याप कोणताही गैरप्रकार किंवा संशयास्पद काहीही आढळून आलेले नाही. तसेच, जीन हॅकमन आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू कधी आणि कसा झाला हे माहित नाही. बुधवारी दुपारी शेरीफचे डेप्युटी जीन हॅकमन यांच्या पत्नी आणि कुत्र्याच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्यासाठी त्यांच्या ओल्ड सनसेट ट्रेलवरील घरी गेले. “मी फक्त एवढेच सांगू शकतो की आम्ही सध्या प्राथमिक मृत्यू चौकशीच्या मध्यभागी आहोत, शोध वॉरंट मंजूर होण्याची वाट पाहत आहोत,” शेरीफ म्हणाले. “मी संपूर्ण समुदाय आणि परिसराला खात्री देऊ इच्छितो की सध्या कोणालाही कोणताही धोका नाही.” असे त्यांनी म्हटले आहे.
जीन हॅकमनने दोनदा लग्न केले
जीन हॅकमन १९८० पासून न्यू मेक्सिकोतील सांता फे येथे आपल्या पत्नीसोबत राहत आहेत. १९९१ मध्ये त्यांनी बेट्सी अराकावाशी लग्न केले. जीनचे दोनदा लग्न झाले होते आणि त्यांना तीन मुले होती. त्यांचे पहिले लग्न फेय माल्टीजशी झाले होते, जे ३० वर्षे टिकले. यानंतर त्यांनी १९९१ मध्ये अरकावाशी लग्न केले. आणि नंतर ते तिच्यासोबत राहू लागले.
Kubera: ‘कुबेरा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; शेखर कम्मुलाच्या चित्रपटात दिसणार हे साऊथ स्टार!
जीन हॅकमन २००४ मध्ये चित्रपटांमधून निवृत्त झाले
जीन हॅकमन १९८० पासून न्यू मेक्सिकोतील सांता फे येथे आपल्या पत्नीसोबत राहत आहेत. १९९१ मध्ये त्यांनी बेट्सी अराकावाशी लग्न केले. जीन हॅकमनच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी ४० वर्षे चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ‘द फ्रेंच कनेक्शन’, ‘सुपरमॅन’ आणि ‘द रॉयल टेनेनबॉम्स’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले, ज्यासाठी त्यांचे खूप कौतुक झाले. २००४ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतली. जीन हॅकमन यांनी १९६४ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.