(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत येत्या पाच दिवसांत मोठा ट्विस्ट येणार आहे. या मालिकेत जीवा आणि काव्याच्या अफेअरचं खरं सत्य अखेर सर्वांसमोर उघड होणार आहे. स्टार प्रवाहने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक प्रोमो शेअर केला आहे ज्यात दिसत आहे, की जीवा आणि काव्याचे नातं आता देशमुख कुटुंबासमोर येणार आहे. यामुळे एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. जीवा आणि काव्याचे अफेअर सगळ्यांसमोर उघड करण्यासाठी वसु आत्याने काय प्लॅन रचलाय याचाही प्रोमो आता प्रेक्षकांसमोर आला आहे.
जीवा नंदिनी, पार्थ काव्या यांची एकमेकांशी मनाविरूद्ध लग्न झालेली असताता. पण, हळूहळु आता या जोडप्यांमध्ये प्रेम बहरू लागलं आहे. जीवाला ऑफिसमध्ये यश मिळते तर, काव्या परिक्षेत उत्तीर्ण होते यानिमित्ताने देशमुखांनी पार्टीचे आयोजन केल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला येत्या 16 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण होणार आहे आणि वर्षपूर्तीच्या या एपिसोडमध्येच प्रेक्षकांसाठी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पार्टीत सगळा परिवार एकत्र पाहायला मिळत आहे आणि सगळं खुश दिसत आहेत. यावेळी नंदिनी म्हणते, “एक वर्षांपूर्वी आम्ही सगळे नकळत एकमेकांना भेटलो होतो. आजचा हा दिवस प्रेमाचा आणि विश्वासाचा आहे आणि त्याचसाठी हे खास सरप्राइज आहे.” तिच्या या भावनिक भाषणानंतर सर्वांच्या नजरा मोठ्या स्क्रीनकडे वळतात, जिथे वर्षभरातील खास आठवणींचे फोटो दाखवले जातात.
स्क्रीनवर झळकणारा पहिला फोटो असतो, जीवा आणि नंदिनीचा. तो फोटो पाहून नंदिनी लाजून खाली नजर करते. कार्यक्रमाचा माहोल प्रेमळ आणि आनंदी होतो. परंतु पुढच्याच क्षणी स्क्रीनवर काव्या आणि पार्थचा एक फोटो झळकतो. यानंतर जे काही घडते ते पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. या पार्टीत सर्वांसमोर जीवा- काव्याचा लग्नाआधीचा रोमॅंटिक फोटो स्क्रीनवर झळकतो. दुसऱ्या एका फोटोत कॅफमध्ये जीवा काव्याला घास भरवत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे फोटो पाहून नंदिनी, पार्थ, मानिनी, विक्रम या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. यामुळे काव्या आणि जीवाला देखील प्रचंड धक्क्यात असतात. दुसरीकडे वसु आत्या आणि रम्याला समोर सुरू असलेला तमाशा पाहून खूपच आनंद होतो. कारण या दोघींनी मिळून काव्या आणि जीवाचे जुने फोटो शोधलेले असतात.
हा विशेष भाग 16 डिंसेबरला प्रसारित होणार आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका ने लिहिले,”आता सगळं उघड झाल्यावर ही मालिका पाहायला अजून मजा येणार”, ”आता भांडं फुटलं”… आता खरी कसोटी लेखखांची आहे. अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.हा अनपेक्षित ट्विस्ट नात्यांवर काय परिणाम करणार? आणि हे सर्व दाखवण्यामागे नक्की कोणाचा डाव आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.






