कुर्रर्र बाळाचं नाव आहे... अभिनेता शशांक केतकरने आपल्या लेकीचं नाव केलं जाहीर
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे घराघरात पोहचलेला अभिनेता शशांक केतकर आता दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. ही गोड बातमी त्याने आपल्या सोशल मीडिया अकॉउंटवरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने आपण दुसऱ्यांदा बाबा होणार आहोत ही आनंदाची बातमी शेअर केली होती. शशांक आणि त्याची पत्नी प्रियांका यांनी खास मॅटर्निटी फोटोशूट सुद्धा केले होते. आता शशांकने एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या मुलीचे नाव जाहीर केले आहे.
शशांकच्या वैवाहिक आयुष्याला 4 डिसेंबर 2027 मध्ये मैत्रीण प्रियांका ढवळेसोबत सुरुवात झाली. यानंतर 2021 मध्ये शशांक पहिल्यांदा बाबा बनला. त्याने आपल्या मुलाचे नाव ऋग्वेद असे ठेवले. आता 2025 मध्ये शशांकला मुलगी झाली आहे. ‘हम दो हमारे दो’ असं म्हणत त्याने आपल्या मुलीचे नाव इंस्टग्रामवर जाहीर केले आहे. शशांकने आपल्या मुलीचे नाव ‘राधा’ असे ठेवले आहे.
इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करण्यासोबतच अभिनेता शशांक केतकरने एक खास फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवला आहे. या स्टोरीमध्ये त्याने प्रियांका, ऋग्वेद, राधा आणि स्वतःचे नाव लिहिले आहे. सध्या सोशल मीडियावर शशांकवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच अनेक मराठी कलाकारांनीही त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.