(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात खेळ आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. घरात प्रत्येक सदस्य स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी धडपडत करताना दिसत आहे, आता ‘कॅप्टन्सी’ (Captaincy) वरून घरात मोठे वाद आणि राडा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या प्रोमोवरून यामध्ये दिव्या कॅप्टन्सी क्षमतेवर इतर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या सगळ्यांच्या विरोधात जाणून दिव्या सगळ्यांसोबत लढताना दिसली आहे. आणि तिचा खेळ ती एकटी खेळत आहे.
दिव्याच्या क्षमतेवर घरच्यांचे प्रश्न
प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, घरातील सदस्य कॅप्टन्सीच्या मुद्द्यावर एकत्र चर्चा करत आहेत. यावेळी काही सदस्यांनी दिव्यावर थेट निशाणा साधला आहे. अनुश्री म्हणताना दिसते की, “दिव्या कॅप्टन्सीसाठी पात्र नाही,” तर दुसरीकडे रुचिता देखील आपलं मत मांडण्यास सुरुवात करते, “कॅप्टन असा असावा ज्याने दोन्ही बाजूंचे म्हणणे नीट ऐकून घेतले पाहिजे. त्यात सुमित आणि सागर यांचे म्हणणे देखील समोर येते. दिव्या mature नाहीये अजून, “अनुभवाच्या जोरावर दिव्या इतरांपेक्षा थोडी कमी पडते.’ असे ते म्हणताना दिसले आहेत.
“अनुभव जन्मत: नसतो…’ दिव्याचे घरातील सदस्यांवर भडकते
घरातील सदस्यांनी लावलेल्या आरोपांनंतर दिव्या शांत बसलेली नाही. तिने आपली बाजू मांडली आहे. दिव्या म्हणते, “अनुभव जन्मतः कोणालाच नसतो. जर तुम्ही असं म्हणत असाल, तर मी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात उभी राहते!” दिव्याचा हा करारी बाणा पाहून आता घरातील समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. आता हा कॅप्टन्सी टास्क नक्की कोण जिंकतं हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आता दिव्या तिचे मुद्दे घरच्यांना पटवून देऊ शकेल का? की तिला या कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागेल? कोण बनणार घराचा कॅप्टन ? हे सगळं ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ च्या भागात पाहायला मिळणार आहे.






