(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील ‘तुला जपणार आहे’ मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच मालिकेमधील मीरा मायाने रचलेल्या जाळ्यात अडकणार आहे. तिला वाचवण्यासाठी अथर्व पुढे येणार आहे.
Jolly LLB 3 OTT: अर्शद-अक्षयचा आता ओटीटीवर कल्ला; १०० कोटींचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या कथानकात उत्सुकता अधिक वाढत चालली आहे. अथर्व आणि मीराच्या आयुष्यात हळूहळू प्रेमाचं नातं उमलतं चाललं आहे. प्रत्येक प्रसंगातून त्यांच्यातील नातं अधिक दृढ होताना दिसते आहे. तर दुसरीकडे अनन्या आणि दादासाहेब सतत अथर्वची फिरकी घेताना दिसत आहेत. मीराच्या साधेपणात, मीराचा प्रेमळ स्वभाव आणि वेदासोबतच्या गोड क्षणांमध्ये अथर्व ओढला जातोय. सुरुवातीला अथर्व हे मान्य करत नसला तरी, तरी प्रत्येक छोट्या क्षणात मीराचं अस्तित्व त्याच्यासाठी खास ठरत आहे. फाउंटनमधला पावसासारखा प्रसंग, तिच्या आवडत्या रंगाचे कपडे, आवडीचा पदार्थ या सगळ्या गोष्टींनी अथर्वच्या मनातलं प्रेम नकळत फुलतं जाते आहे.
दरम्यान, माया मीराविषयी इर्षेने ग्रासलेली असून ती मीरा विरोधात कट रचतेय. खोटं सांगून ती मीराला गावाकडे पाठवते आणि त्याचवेळी तिच्यावर जीवघेणा हल्ला घडवून आणते. परिस्थिती अत्यंत बिकट होते, जेव्हा मीरा अथर्वला मदतीसाठी फोन करते आणि फक्त “वाचवा” एवढंच बोलते. अथर्व तिचं ठिकाण कळताच, अथर्व तिच्या मदतीला धावून जात असताना त्याला अनन्याचे शब्द आठवतात, आणि त्या धुंदीत तो स्पीडने गाडी चालवतो.”
Dhurandhar: रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ मधील आर माधवनचा जबरदस्त लूक रिलीज, चाहते पाहून चकीत
अथर्व गाडी वेगाने चालवत असतानाच गाडीचा अपघात होतो. आता मीराला तो गुंडान पासून वाचवू शकेल का? आणि मीरा समोर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘तुला जपणार आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांना दिसणार आहे. झी मराठीवरील या मालिकेची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. तसेच या मालिकेमध्ये पुढे काय होईल? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.






