Akshaya Hindalkar To Appear In 'P.S.I. Arjun' Share Screen With Ankush Chaudhary
सध्या अंकुश चौधरीच्या ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. येत्या ९ मे रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार असून चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. अंकुश चौधरी पी.एस.आय. अर्जुनच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत मराठी इंडस्ट्रीतील टेलिव्हिजन मालिकेंमध्ये मुख्य भूमिका साकारलेली एक प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार आहे. ती नेमक्या कोणत्या भूमिकेत हे सुद्धा अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
निसर्गात हरवून, मैत्रीत रंगणारे ‘बंजारा’ मधील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित
मराठी चित्रपटांतून आणि टेलिव्हिजन सीरियल्सच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झालेली सुप्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटांत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘पुन्हा कर्तव्य आहे’ फेम अभिनेत्री अक्षया हिंदळकर आहे. ‘पी.एस.आय अर्जुन’ चित्रपटामध्ये अंकुशसोबत अभिनेत्री अक्षया हिंदळकर काम करताना दिसणार आहे. विविध मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अक्षया मोठ्या पडद्यावर काम करण्यास सज्ज झाली आहे. ९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पी.एस.आय. अर्जुन’मध्ये ती अंकुशसह स्क्रिन शेअर करताना दिसेल. ॲक्शन आणि सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटात अक्षया कोणत्या भूमिकेत दिसणार, हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. असे असले तरी अक्षयाच्या चाहत्यांना ती एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार, हे नक्की…
गुन्हेगारीला भिक्षा नाही शिक्षा मिळणार, गुन्हेगारांची बोलती बंद करणाऱ्या Posco 307 चा ट्रेलर रिलीज
ॲक्शन आणि सस्पेन्सने भरलेल्या चित्रपटातील भूमिकेविषयी सांगताना अक्षया हिंदळकरने सांगितलं की, “पहिल्याच चित्रपटात मला दिग्गज कलाकारांसोबत काम करायला संधी मिळणे, ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. आजवर कधीही न साकारलेली भूमिका मी या चित्रपटात साकारणार आहे. चित्रपटाचे स्क्रिप्ट ऐकून मी या चित्रपटाला त्वरित होणार दिला. यात इतके मातब्बर कलाकार असल्याने सुरुवातीला थोडे दडपण होते. परंतु हे सगळे सहकलाकारला इतके कम्फर्टटेबल करतात, की आपले काम आपसूकच चांगले होते. या सगळ्यांकडून शिकण्यासारखे खूप आहे. या सगळ्यासोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली असून मनात संमिश्र भावना आहेत.” व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित ‘पी.एस.आय.अर्जुन’चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे रोजी ‘पी. एस. आय. अर्जुन’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.