विश्वंभर ठाकूर नावाच्या वादळाला कशा सामोऱ्या जातील 'पारू' आणि 'सावली'? येणारं संकट कसं रोखणार
झी मराठीवरील मालिकेंमध्ये अनेकदा प्रेक्षकांना महासंगम पाहायला मिळाला आहे. आता या दरम्यान अशातच ‘पारू’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या दोन मालिकांचा प्रेक्षकांना महासंगम पाहायला मिळणार आहे. १२ मे ते १७ मे दरम्यान प्रेक्षकांना हा महासंगम पाहायला मिळणार आहे. किर्लोस्कर आणि मेहंदळे कुटुंबीयांवर एकत्र एक मोठं वादळ येणार आहे. या वादळाला पारु आणि सावली कशापद्धतीने सामोरे जाणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नुकतंच ‘पारू’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेच्या महासंगमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये मालिकेमध्ये एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.
साऊथ अभिनेता विशाल कार्यक्रमादरम्यान स्टेजवर झाला बेशुद्ध; केले रुग्णालयात दाखल, आता कशी आहे तब्येत?
‘पारू’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेमध्ये एका ज्येष्ठ कलाकाराची एन्ट्री होणार आहे. विश्वंभर ठाकूर नावाची भूमिका ज्येष्ठ मराठमोळे अभिनेते नागेश भोसले साकारणार आहे. विश्वंभर ठाकूर नावाचं वादळ आल्यानंतर ‘पारू’, ‘सावली’ आणि त्यांचं कुटुंबीयं कशा पद्धतीने सामोरं जाणार ? हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, ‘पारू’ आणि ‘सावली’ एकमेकींच्या फार चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे सावली पारूला सांगते, “आमच्या सोहम भावोजींसाठी लग्नाचं स्थळ पाहिलंय. विश्वंभर ठाकूर यांच्या मुलीबरोबर म्हणजेच कियारा ठाकूरशी त्यांचं लग्न ठरवत आहेत.” त्यानंतर पारुला काही पूर्वीच्या गोष्टी आठवायला लागतात.
मैत्रिणीच्या मेहेंदीला गेला अन् मृत्यूने गाठलं, प्रसिद्ध कॉमेडियनचा हृदयविकारामुळे मृत्यू
पारुने विश्वंभर ठाकूरबद्दल अहिल्यादेवींच्या तोंडून पूर्वी ऐकलेल्या गोष्टी तिला आठवायला लागतात. तिच्या ते लक्षात आल्यानंतर पारू सावलीला ‘त्या घातक माणसाला मेहंदळे कुटुंबापासून दूर ठेव’ असा मोलाचा सल्ला देते. त्यानंतर ‘पारू’ आणि ‘सावली’ एकत्र येत विश्वंभर ठाकूर नावाच्या वादळाला आणि त्याच्या मुलीला कसा धडा शिकवायचा याचा प्लॅन रचताना दिसत आहे. दरम्यान, विश्वंभर ठाकूरच्या भूमिकेत अभिनेते नागेश भोसले दिसणार आहे. तर, त्याच्या मुलीच्या म्हणजेच कियारा ठाकूरच्या भूमिकेत ‘चल भावा सिटीत’ या रिॲलिटी शोमधून महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेली अक्षता उकिरडे प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्या शोमुळे अक्षताचं भाग्य उजळलं आहे.
‘तू तिथे असतास तर…’, शस्त्रक्रियेनंतर डोळे उघडताच सैफ झाला भावुक, मुलगा इब्राहिमलाही आले रडू!
अनेक चित्रपटांमध्ये आणि टिव्ही सिरियलमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्यानंतर पुन्हा एकदा महासंगममध्येही नागेश भोसले नकारात्मक भूमिका साकारणार आहेत. दरम्यान, नागेश भोसले आणि अक्षदा उकिरडेच्या एन्ट्रीनंतर ‘झी मराठी’वरील ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेमध्ये एन्ट्रीमुळे हा महासंगमाचा प्रोमो तुफान व्हायरल होत आहे.