"विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही...", बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया
बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 52 हजार 452 मतांची आघाडी घेतली आहे. बारामतीचा विजय हा अजितदादांना समर्पित आहे. विजयाचा जल्लोष कुणी कार्यकर्त्यांनी करू नये. गुलाल उधळू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आहे.
आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम… — Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) May 4, 2026
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असताना, आपण मतदानाच्या माध्यमातून दाखवलेल्या विश्वासाला मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना अर्पण करते. आज हा निकाल जाहीर होत असताना, आदरणीय दादांच्या आठवणी पुन्हा उजळून निघाल्या असून आपण सर्वजण भावूक झालो आहोत. दादांवर अपार प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की, या विजयाच्या आनंदात कोणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. बारामतीकरांनी मला दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. ही शेवट नाही, तर ही एक नवी सुरुवात आहे , निश्चयाची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!






