"पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी" - छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, “राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल-डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे २० टक्के अधिक पेट्रोल-डिझेलची विक्री झाली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
“देशाचे पंतप्रधान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अफवा किंवा भीतीच्या वातावरणामुळे अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नाही,” असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. यावेळी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील गेल्या काही दिवसांतील इंधन विक्रीची आकडेवारीही माध्यमांसमोर मांडली. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
विधान परिषदेतील जागांवरून महायुतीत वादाची ठिणगी; भाजपचे संख्याबळ कितीही असले तरी…
पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचतीविषयी देशवासियांना केलेल्या आवाहनानंतर देशभरातील नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आपल्या वाहनांच्या ताफ्यात मोठी घाट केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातसुद्धा याचे मोठे पडसाद पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याआधीच आपल्या मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधत आपल्या वाहनांचा ताफा कमी करत असल्याचे सांगितले आहे. याशिवाय ते इलेक्ट्रिक वाहनांमधूनच प्रवास करताना दिसून आले. मंत्री नितेश राणे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री उदय सामंत, भाजप नेते प्रवीण दरेकर हेदेखील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.
“पंतप्रधान मोदी, अमित शहा देशाचे गद्दार,” राहुल गांधी यांच्या वक्तव्याने देशभरात खळबळ






