Rahul Gandhi on Municipal Election: मतचोरी हे राष्ट्रविरोधी कृत्य....;' महाराष्ट्र निवडणूक आयोगावर राहुल गांधींचा निशाणा
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या मतदानादरम्यान बोटावरील शाई सहजपणे पुसून टाकली जात असल्याच व्हिडीओ समोर आला. यावरून राहुल गांधी यांनी याला लोकशाहीची थट्टा असल्याची टिका केली आहे. तर त्याचवेळी निवडणूक आयोगाने मात्र या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशीचे आदेश दिले आहे. (BMC Election 2026)
मत चोरणे हा देशविरोधी कायदा : राहुल गांधी
महाराष्ट्रातील महारापालिका निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईच्या गुणवत्तेबाबत राज्यभरातील मतदारांकडून प्रश्न उपस्थित केले गेले. हे प्रकरण आता राष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटर एक्स वर प्रतिक्रीया देताना निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोग नागरिकांची दिशाभूल करत आहे. लोकशाहीवरील जनतेचा विश्वास उडत चालला आहे. मतचोरणे हा देशविरोधी कायदा आहे.” अशी टिका राहुल गांधी यांनी केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका संस्थांसाठी गुरुवारी मतदान झाले. मतदान प्रक्रिया सुरू असतानाच मतदान केलेल्या मतदाराच्या बोटावरील शाई एसीटोन किंवा इतर रसायनांनी सहजपणे पुसली जाते, असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. यावरून शाई पुसून बोगस मतदार वारंवार मतदान करू शकतात, असा आरोप विरोधकांकडून होऊ लागला. बोगस मतदार अशा प्रकारे वारंवार फसवे मतदान करू शकतात, जर शाई कायमची नसेल तर त्यामुळे फसव्या मतदानाची शक्यता वाढते, जे निवडणूक निष्पक्षतेच्या विरुद्ध आहेय
पण त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. शाईवरून होणाऱ्या वादावरून राज्य निवडणूक सुरूवातीला आयोग मागे पडल्याचे दिसून आले. पण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी, आयोगाकडून मार्कर पेनच्या गुणवत्तेची आणि व्हायरल व्हिडिओची सविस्तर चौकशी करेल. व्हिडिओमध्ये दाखवलेली शाई खरी आहे की खोडसाळपणा आहे हे निश्चित केले जाईल. खबरदारी म्हणून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मार्कर पेन वापरला जाणार नाही.” असे जाहीर केले. (Municipal Election Result 2026)
वाद संपवण्यासाठी, आयोगाने म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेडची फक्त पारंपारिक शाई वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत वापरली जाणारी शाई आहे आणि ती पुसणे जवळजवळ अशक्य आहे. आयोग राज्यभरातून मार्कर पेनचे यादृच्छिक नमुने देखील गोळा करेल आणि ते प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी पाठवेल.






