मराठी-हिंदी वाद पेटणार; अमराठी नागरिकांकडून राज ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
Thackeray Brothers Alliance: हिंदी सक्तीविरोधात झालेल्या विजयी मेळाव्यात तब्बल २० वर्षांनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र आले. तेव्हापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. पण दोन-तीन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कोणतेही भाष्य करण्यास विरोध केला आहे.यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा एक सूचक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाने युतीबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच होता. त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. नाशिकमधील इगतपुरी येथे आजपासून दोन दिवस मनसेचा मेळावा होत आहे. राज ठाकरे मेळाव्यासाठी आज सकाळीच इगतपुरीत दाखल झाले. इगतपुरीतील अनौपचारिक गप्पांवेळी राज ठाकरेंनी यांनी केलेल्या या विधानामुळे युती सस्पेन्स अजून कायम आहे. कार्यकर्त्यांसोबत ठाकरे गटासोबतच्या युतीवर भाष्य केलं आहे. “ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. मात्र, मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच, त्याचा राजकारणाशी संबंध नाही. नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये काय परिस्थिती आहे, हे पाहून युतीचा निर्णय घेऊ, ‘ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या विजयी सभेनंतर राज्यभरात दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्येही एकजुट होऊ लागली. पण पण युतीसंदर्भात मनसेच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलू नये, असे आदेश राज ठाकरेंकडून देण्यात आले. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनीदेखील असेच विधान केलं. ‘ आम्ही यापूर्वी एकटे लढलो आता वेळ आली तरी आपण एकटे लढू’ असं बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं. तसेच, युती संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नको ,असं सामनातूनही सांगण्यात आले आहे.
मराठी भाषेच्या मुद्द्यावर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र आले आहेत. या एकतेला मराठी माणसांचा जोरदार पाठिंबा लाभत असून, त्यामागे असलेला जनतेचा रेटा अभूतपूर्व मानला जात आहे. राजकीयदृष्ट्या देखील ठाकरे बंधू एकत्र यावेत, अशी जनभावना असून, दिल्ली तसेच महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांकडून ही युती होऊ नये यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता ‘सामना’मधून व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या संभाव्य युतीची सर्वाधिक भीती वाटत असल्याचंही ‘सामना’त नमूद करण्यात आलं आहे.
अखेर ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला केले निलंबीत; ड्रंक अॅन्ड ड्राईव्हप्रकरणी मोठी कारवाई,
दरम्यान, ‘रोखठोक’मधून यासंदर्भात संभ्रम नको, असं स्पष्ट आवाहन करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना (ठाकरे गट) व मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यामुळे या युतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, नुकतेच इगतपुरीमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, “विजयी मेळावा केवळ मराठी अस्मितेसाठी होता, त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. युतीचा निर्णय नंतर घेतला जाईल.”