भारतीय संस्कृतीत लग्नसंस्थेला मोठं महत्व आहे. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं एकत्र येणं नव्हे तर दोन घरं दोन कुटुंब जोडली जातात, असा अर्थ भारतीय संस्कृतीत विवाहाचा सांगितला जातो. त्यामुळे लग्न या संकल्पनेला भावनिक ओलावा आहे. लग्नात पती पत्नी आयुष्यभरासाठी सात फेरे आणि सात वचनं घेतात. मात्र सगळेच हे वचन पाळतात असं होत नाही. अनेकांच्या बाबतीत असं होतं की, प्रयत्न करुन देखील नातं सुधारत नाही आणि पर्यायाने वेगळं होणं भाग पडतं काही जण आयुष्य तिथेच थांबवतात तर काहीजण आयुष्याला नवी संधी देतात आणि आयुष्य़ात आलेल्या नव्य़ा व्यक्तीबरोबर आनंदाने जगतात. ज्योतिष शास्त्रानुसार अशा काही राशी आहेत ज्यांच्या आयुष्यात दोन विवाहयोग येतात. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊयात…
ज्योतिषशास्त्रात व्यक्तीची कुंडली पाहून त्याच्या भविष्यातील चांगल्या वाईट घटनांचा अंदाज बांधला जातो. याच ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही राशी आहेत ज्यांच्या कुंडलीत दोन विवाहांचा योग असतो.
राशी स्वामी शुक्र असल्याने या राशीतील व्यक्ती सहसा प्रेमविवाह करते. मात्र काहींच्या बाबतीत असं होतं की नातं सावरणं कठीण होतं आणि एका वेळेनंतर नको असलेल्या नात्यातून या व्यक्ती बाहेर पडतात. ही माणसं मन मारुन कधीच कोणतं नातं टिकवत नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार, ही माणसं दिसण्यावरुन रागीट वाटत असली तरी अत्यंत भावनिक असतात. मनापासून नातं देखील जपतात पण जेव्हा त्य़ांना एखाद्या नात्यात तणाव निर्माण झाल्याचं वाटत असेल तर ही मंडळी स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या चांगल्यासाठी नको असलेल्या नात्यातून बाहेर देखील पडतात. नात्यातली फसवणूक यांना मुळीच आवडत नाही.
शुक्राच्य़ा प्रभावाखाली असलेली ही मंडळी मनापासून प्रेम निभावतात. यांना सोबत असलेल्या माणसाचा स्वभाव सगळ्यात आधी महत्वाचा वाटतो. नात्यात आदर, प्रेम आणि विश्वास असावा असा यांचा दृष्टीकोन असतो. एखादं नातं मनापसून जोडलं की ते शेवटपर्यंत त्यासाठी प्रयत्न करतात. मात्र जर त्यांना असं जाणवलं की आपले प्रयत्न एकतर्फी आहेत तर ही माणसं ते नातं सोडून देण्याची हिंमत देखील दाखवतात. नात्यात संवाद फार महत्त्वाचा असतो आणि जर विश्वासाने संवाद होत नसेल तर एका वेळेनंतर ही माणसं निभावता न येणारं नातं सो़डून देतात आणि आयुष्यात दुसऱ्या जोडीदाराबाबत विचार करताना सकारात्मकपणे विचार करतात.
धनु राशीच्या मंडळींना स्वतंत्र राहणं आवडतं. त्यांना जर स्वातंत्र्यावर गदा येतेय असं वाटलं तर या व्यक्तींना त्या नात्यात असुरक्षितता वाटते. जर या व्यक्तींना पहिल्या नात्यात ताण तणाव निर्माण झाल्याचं वाटलं तर ही माणसं तर नातं तोडायला ही माणसं मागे पुढे पाहत नाहीत. दुसऱ्यांदा नातं जोडताना ही माणसं पहिल्या नात्याची भिती घेऊन जगत नाहीत. ज्योतिषशास्त्रानुसार, अशा काही राशी आहेत ज्यांचा दोनदा विवाह योग असण्य़ाचा अंदाज सांगितला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)