Dinvishesh : भारतीय बॅडमिंटनचे माजी दिग्गज खेळाडू प्रकाश पादुकोण यांचा जन्मदिन; जाणून घ्या १० जूनचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
Dinvishesh : आजच्या दिवशी १९८२ मध्ये महाराष्ट्रात नेत्रदानाचे महत्त्वपटवून देण्यासाठी दृष्टिदिन साजरा करण्यास सुरुवात झाली होती. याशिवाय आजच्या दिवशी 1940 मध्ये इटली आणि फ्रान्सने इंग्लंडविरोध दुसरे महायुद्ध पुकारले होते, तर नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्कारली होती.
याशिवाय व्यक्ती दिनविशेष मध्ये आज भारताचे माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण याचा जन्म झाला होता. त्यांनी भारताला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून दिले होती. १९८० मध्ये त्यांनी जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पहिले स्थान मिळवले होते आणि असे करणारे ते पहिले भारतीय ठरले. याशिवाय त्यांनी ‘ऑल इंग्लंड ओपन’ स्पर्धा जिंकून इतिहास रचला होता.
10 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
10 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)
1213 : ‘फख्रुद्दीन’ – इराकी पर्शियन तत्त्वज्ञ यांचा जन्म.
1908 : ‘जयंतीनाथ चौधरी’ – भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्मविभूषण जनरल यांचा जन्म. (मृत्यू: 6 एप्रिल 1983)
1916 : ‘विल्यम रोसेनबर्ग’ – डंचिन डोनट्स चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 2002)
1924 : ‘डॉ. आर. ए. भालचंद्र’ – नेत्रशल्यविशारद यांचा जन्म.
1938 : ‘राहुल बजाज’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
1938 : ‘एन. भाट नायक’ – भारतीय गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 12 फेब्रुवारी 2009)
1955 : ‘प्रकाश पदुकोण’ – भारतीय बॅडमिंटनपटू यांचा जन्म.
1972 : ‘सुंदर पिचाई’ – भारतीय-अमेरिकन उद्योगपती यांचा जन्म.
10 जून रोजी मृत्यू दिनविशेष
1836 : ‘आंद्रे अॅम्पिअर’ – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 20 जानेवारी 1775)
1903 : ‘लुइ गीक्रेमॉना’ – इटालियन गणितज्ञ यांचे निधन.
1906 : ‘गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर’ – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री यांचा जन्म. (जन्म: 20 सप्टेंबर 1909)
1955 : ‘मार्गारेट अॅबॉट’ – भारतीय-अमेरिकन गोल्फर यांचे निधन. (जन्म: 15 जून 1878)
1976 : ‘अॅडॉल्फ झुकॉर’ – पॅरामाउंट पिक्चर्स चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 7 जानेवारी 1873)
2001 : ‘फुलवंतीबाई झोडगे’ – सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन.
Dinvishesh : इस्लामचे अंतिम प्रेषित मोहम्मद पैगबंर यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ०८ जूनचा इतिहास






