Dinvishesh : जगावर राज्य करणारी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २४ मे चा इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आज २४ मे, जगाच्या इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या आहेत. सामाजिक, आर्थिक, आणि दैनंदिन जीवनात या घटनांचे विशेष महत्त्व असते. आज आपण या घटनांचा आढावा घेणार आहोत.
आजच्या दिवशी, १८१९ मध्ये ब्रिटनची राणी आणि ब्रिटिश भारताची सम्राज्ञी राणी व्हिक्टोरिया जन्म झाला होता. राणी व्हिक्टोरियाने ब्रिटन आणि आयर्लंडवर ६३ वर्षे राज्य केले. त्यांच्या कार्यकाळाला व्हिक्टोरियन युग म्हणूनही ओळखले जाते. या काळात ब्रिटनची राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक आणि लष्करी प्रगती झाली. इ.स १८५७ च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली आणि राणी व्हिक्टोरियाच्या नावाने भारतात कारभार सुरु झाला. राणी व्हिक्टोरियाला हिंदुस्थानची सम्राज्ञी असा किताब ही मिळाला आहे.
24 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
24 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






